अंबिका फार्म हाऊस येथील लग्न समारंभावर बंदी घाला : प्रशांत इखार कोरोणा महामारीत सुपर स्प्रेडर रोखण्याबाबत निवेदन

अंबिका फार्म हाऊस येथील लग्न समारंभावर बंदी घाला : प्रशांत इखार

कोरोणा महामारीत सुपर स्प्रेडर रोखण्याबाबत निवेदन

अंबिका फार्म हाऊस येथील लग्न समारंभावर बंदी घाला : प्रशांत इखार कोरोणा महामारीत सुपर स्प्रेडर रोखण्याबाबत निवेदन
अंबिका फार्म हाऊस येथील लग्न समारंभावर बंदी घाला : प्रशांत इखार
कोरोणा महामारीत सुपर स्प्रेडर रोखण्याबाबत निवेदन

कळमेश्वर तालुका प्रतीनधी —

युवराज मेश्राम

कोहळी परिसरातील अंबीका फाॅर्म हाउस येथे शासनाने कोरोना माहामारीबाबत घातलेल्या जमावबंदि अध्यादेशाचे सर्रास उल्लंघन करुन हजाराच्यावर नागरिकांच्या उपस्थीतीत लग्नसोहळे मोठ्या प्रमानात होत असल्याने त्यावर बंदि घालन्याबाबतचे निवेदन युवासेनेचे जिल्हाउपप्रमुख प्रशांत ईखार यांच्या नेत्रुत्वात नुकतेच तहसीलदार सचीन यादव यांना देण्यात अाले.
सध्यास्थितीत संपूर्ण देशासह राज्यात कोरोणा महामारीने थैमान घातले असताना सार्वजनिक कार्यक्रमांसह लग्न सोहळ्यातील गर्दिबाबत शासनाने कठोर निर्णय अमलात आणून बंदी घातलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी व लग्नसोहळे यावर संख्या व नियम घातलेले असताना, याची कळमेश्वर तालुक्यात बहुतांश अंमलबजावणी होतही आहेत. परंतु कोहळी परिसरातील अंबिका फार्म हाऊस येथे ग्राहकांकडून लाखो रुपये घेत शासन निर्देशांचे उल्लंघन करीत एक हजारच्या वर संख्येने नागरिकांची कार्यक्रमात गर्दी केल्या जात आहे. हा प्रकार तालुक्यासाठी सुपर स्प्रेडर ठरणार आहे. एखाघ्या नागरिकाने सबंधीत विभागाकडे तक्रार केल्यास अालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून नियमाने कार्यक्रम होत असल्याचा दिखावा करुन त्यांना अापल्यावर असलेल्या वरदहस्ताचा धाक दाखवत त्यांना परत पाठविन्याचे सारखे प्रकार घडत असल्याने याबाबतचा कारवाईचा प्रश्न निर्मान झाला अाहे.
मोठ — मोठ्या शहरातील धनदांडग्यांना गाठून लाखो रुपये घेत येथे लग्नसोहळे मोठ्या उपस्थीतीत केल्या जात अाहेत. हा प्रकार शासकीय निर्देशानुसार पायमल्लीचा ठरत आहे. अंबिका फार्म हाउस मधील सूरु असलेल्या लग्न कार्यक्रमावर सध्यास्थितीत बंदी घालून आपण जबाबदार अधिकारी म्हणून कारवाई कराल व तालुका सुरक्षित आणि कोरोना फैलावा पासून मुक्त कराल अशी तहसीलदार यांना निवेदन देत मागणी केली अाहे.यावेळी यूवासेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रशांत ईखार,मोरेश्वर रक्षक, प्रदीप गोतमारे, विजय वाघधरे, सचिन रघूवंशी,सुरेश लंगडे, संजय रक्षक , अविनाश पाटील अादि शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थीत होते.