वणी शहरातील जुने काॅटन मार्केट येथे डुक्करांच्या कळपाचा हौदास, प्रशासनाने दुर्लक्ष.

✒साहिल महाजन ✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी मीडिया वार्ता न्यूज 9309747836
यवतमाळ/ वणी,दि.9जुलै:- यवतमाळ जिल्हातील वणी शहरातील जुने काॅटन मार्केट येते डुक्करांच्या कळपानी मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातला असून प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
वणी येथील जुने काॅटन मार्केट वार्डां मध्ये डुक्कर रस्त्यांनी फिरतात त्यामुळे या वार्डामधील लोकांच्या आरोग्याला व त्यांच्या तब्बेतीला धोक्याचे आहे असे त्या वार्डातील नागरीकांचे म्हणणे आहे. वणी शहरातील जुने काॅटन मार्केट या वार्डातील नागरीकांना डेगु, मलेरीया, कोरोना सारख्या जीव घेणाऱ्या आजारांचा सामना करावा लागत आहे.
आता तर पावसाळा सुरू झाला आहे आता तर आरोग्याला भिती आहे व वरून डुक्करांचे सामने करावे लागत आहे असे नागरीक म्हणत आहेत.. वणी शहरातील जुने काॅटन मार्केट येते डुक्करां पासुन लोक आजारी पडु शकतात तसेच लहान मुलांना डुक्करां पासुन धोका निर्माण होऊ शकतो असे नागरीकांचे म्हणणे आहे.. याला जिमेद्दार कोण? आणी नगरपालिका का लक्ष देत नाही? आणी या कोरोनाच्या महामारी मध्ये नगरपालिका लक्ष देत नसुन झोपेचे सोंग घेतल आहे अस दिसून येत आहे. नगरपालिका प्रशासनाने काही तरी उपाययोजना करावी अशी मागणी जुने काॅटन मार्केट या वार्डांमधील नागरीक करीत आहेत. व या डुक्करांना वार्डांमधुन दुर करावे अशी ही मागणी नागरीक करत आहे.