दोन ट्रकच्या समोरासमोरील धडकेत एक जण गंभीर जखमी

दोन ट्रकच्या समोरासमोरील धडकेत एक जण गंभीर जखमी

दोन ट्रकच्या समोरासमोरील धडकेत एक जण गंभीर जखमी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडला अपघात,

वाशीम : – कारंजा तालुक्यातील तपोवन येथे दोन ट्रकच्या समोरासमोरील धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना नागपूर औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील तपोवन जवळ घडली विजयकुमार यादव वय ३२ वर्षे असे या अपघात गंभीर झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते प्रतापगड उत्तरप्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्राप्त माहिती नुसार सी जी ०७ बी एम ५५८९ व एम एच ०५ डी के ८०६८ क्रमांकाचे दोन ट्रक विरुध्द दिशेने जात असताना वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मार्गातील अपघात स्थळी एकमेकांना समोरासमोर भिडल्याने हा अपघात घडला अपघाताच्या घटनेनंतर जखमी व्यक्तीला प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन वृत्त लिहेस्तोवर जखमी व्यक्तीवर उपचार सुरूहोते दरम्यान पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पोलिस पुढील तपास करीत आहे.✍