आष्टी-आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गाची ही अवस्था…
मुलचेरा ता.प्रतिनीधी
महेश बुरमवार
मो.न.9579059379
आज दि.08/07/2022 रोजी आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावर मुत्तापुर गावाजवळ सुरजागड लोह वाहतूक करणारे दोन गाड्या रस्त्याच्या मधोमध फसल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली..सततच्या पावसामुळे आणि ओव्हर लोड वाहतुकीमुळे अनेक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे, रस्त्याची चाळण तर झालीच आहे पण पावसाळ्यात दरवर्षी हे जड वाहने अशी रस्त्याच्या मधोमध फसतात. आणि सर्व वाहतूक व्यवस्था खोळंबते.
(सुरजागड पहाडीवरून लोहखनिजाची वाहतूक करणारे हे दोन ट्रक रस्त्याच्या खड्ड्यात असे मधोमध फसल्याने आज वाहतूक पुर्णपणे खोळंबली आहे.) सुरजागड लोहखनिज ओवर लोड वाहतूक होत असल्याने राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या मार्गावर प्रवास करणे खुप त्रासाचे व धोकादायक होत चालले आहे.याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन लक्ष दिले पाहिजे.