गोंडपिपरीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

गोंडपिपरीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

गोंडपिपरीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

शरद कुकुडकार
गोंडपिपरी शहर प्रतिनिधी
मो. नं.9518727596

गोंडपिपरी : -गोंडपिपरी येथील व्यंकटपुर मार्गावरील हनुमान मंदिर परिसरात राहणाऱ्या भारत बंडू झाडे वय अंदाजे (३१) या तरुणाने दि.८ शुक्रवारी सायंकाडच्या सुमारास घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

भारत सर्वांसोबत मिळून मिसळून राहणारा नेहमी व्यापाऱ्यांच्या संपर्कात राहणारा व्यक्ति होता तो थंड पाण्याचा वॉटर प्लांट मधे शहरात काम करत होता.रोज नित्यनियमाने गोंडपिपरीतील अनेक लहान मोठ्या व्यापाऱ्यांना थंड पाण्याची कॅन नेऊन द्यायचा त्यामुळे व्यापाऱ्यांसोबत जिव्हाळ्याचे त्याचे समंध होते त्यामुळे भारतच्या आत्महत्येमुळे व्यापाऱ्यांनी देखील दुःख व्यक्त केले.भारत च्या पच्यात आई – वडील ,तीन भाऊ असून झाडे कुटुंबासह गोंडपिपरीत शोककळा पसरली आहे.आत्महत्येचे कारण अद्याप कडले नसून ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार राजगुरू करीत आहे.