पाचोरा – बनोटी रस्त्यावर दोन अज्ञात मोटारसायकल खड्डा चुकवण्यात धडकल्या,
रस्त्याची कामे न झाल्यास मत मागायला फिरू देणार नाही. भाजपा प्रदेश संयोजक श्री तन्मय सुनिल जैन यांचा इशारा.
✍️मनोज एल खोब्रागडे✍️
सह संपादक मीडिया वार्ता न्युज
मोबाईल नंबर : 8208166961
पाचोरा :- नुकताच नांदगाव येथे खड्डा चुकवताना झालेला अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा सोयगाव तालुका मध्ये पाचोरा – बनोटी रस्तावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या. यामध्ये दोघं दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून मागे बसलेल्या एका स्त्रीच्या डोक्याला जबर मुक्का मार तर दुसरी स्त्रीचा पाय तुटल्याचा प्रथम दर्शनी वृत्त आहे. जखमी साठी बनोटी येथून रुग्णवाहिका साठी कॉल केल्यावर रुग्णवाहिका उपलब्ध नाही ती छत्रपती संभाजी नगर येथे आहे असे उत्तर कर्मचारी मार्फत देण्यात आले.
खराब रस्ते अजून किती जीव घेणार, लोकप्रतिनधींकडून काही एक काम का होत नाहीये. फक्त मतासाठी मतदारांचा वापर होतो का? असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहेत.
तर निवडणुकांआधी जर रस्ते सुधारले नाही तर एकही लोकप्रतिनिधींना गोंदेगावं – बनोटी गटात मत मागायला फिरू देणार नाही असा इशारा भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा चे प्रदेश संयोजक श्री तन्मय सुनिल जैन यांनी दिला आहे.
लोकप्रतिनिधी झोपले आहेत का ? मागच्या वर्षी मंजूर झालेला रस्ता कुठे गेला? त्याच्या साठी आलेला ५ कोटीच्या निधीच काय झालं याची चौकशी होणार का असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित झालेले आहेत.