९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त यावल येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

47

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त यावल येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

सुपडू संदानशिव 

यावल तालुका प्रतिनिधी

मो: 9561200938

          जंगल जमिनीचे रक्षण करणाऱ्या आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन केले जाते व जागतिक आदिवासी दिनानिम्मत गौरव दिवस साजरा करण्यात येतो.

       यावल तालुका आदिवासी टोकरे कोळी उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधुन आदिवासी बांधवांच्या पारंपारिक वस्त्र आणी जिवनशैलीचे दर्शन घडविणारे विविध कार्यकम व भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता फैजपुर रोड लगत असलेल्या रेणुका माता मंदिर जवळ चोपडा मतदारसंघाच्या आ.लताताई सोनवणे व रावेर -यावल विधानसभा मतदार संघाचे आ.शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन भव्य रँलीचे उद्धाटन करण्यात येणार आहे. यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, यावलच्या तहसीदार श्रीमती मोहनमाला नाहीकर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, जिल्हापरिषदचे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे व संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित राहतील.

       या रॅलीमध्ये आदिवासीचे विविध सजीव देखावे तसेच सादर करण्यात येणार आहे.सदर रँली रेणुका मंदिर ते आदिवासी प्रकल्प कार्यलयात जावून समारोप करण्यात येणार असून तालुका आणी परिसरातील आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्सव समिती प्रमुख नामदेव कोळी यांनी केले आहे.