नागपुर पल्लवी मेश्राम :- सद्या कोरोना वायरसच्या महामारीने संपुर्ण विश्व भया खाली जिवन जगत आहे. गरीब जनतेच जिवन जगणं आज मुस्किल झाल आहे. दुसरीकळे आरोग्य सेवेचा हलगर्जी कारभार आणी कोरोनाचा नावावर मनमानी प्रकारे करत असलेले पैसाची लूट. रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्यामुळे उपचाराअभावी गरीबांना मरावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
काल उत्तर नागपुर येथील जरीपटका लुबिंनी नगर मध्ये वास्तव्यास असलेले हर्षल जनबंधू यांनी दिलेल्या माहिती नुसार. माझा वडीलांना पुर्वी पासुन हार्डचा प्रोब्लेम होता. ते हार्डचे रुग्ण होते. त्यांना काल तबियेत बरी वाटत नव्हती तर त्यांना नागपुरातीमधिल प्रसिद्ध मेयो रुग्णालयात नेण्यात आले. पण या मेयो रुग्णालयात फक्त हलगर्जी पणाचा कळस गाठला आहे. हार्ड प्रोब्लम असलेल्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा उपचार मिळाला नाही. त्यांना उपचारासाठी ताटकळत राहव लागलं. त्यांना वेळेवर उपचार नाही मिळाल्यामुळे काल त्यांचे निधन झाले. मेयो रुग्णालयात सर्वीकडे मनमानी व तोड़ पाहुन रुग्ण सेवा केली जात आहे. मेयो रुग्णालयात कोरोना वायरस व्यतिरीक्त इतर अनेक गंभीर परिस्थितीत असलेल्या लोकांचे जीव आज धोक्यात आला आहे.
रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागामध्ये बेड उपलब्ध नाहीत. व्हेंटिलेटर व आॅक्सिजन युनिटची कमतरता निर्माण झाली असून, वेळेत उपचार मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. आयसीयू युनिटमध्ये जागाच उपलब्ध होत नसल्यामुळे उपचाराअभावी गरीबच नाही, तर श्रीमंतांनाही मरावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
योग्य उपचार मिळत नसल्याने मृत्युदर वाढत आहे. मनपा प्रशासन अतिरिक्त आयसीयू युनिट, व्हेंटिलेटरची संख्या वाढविणार असल्याची घोषणा करत आहे, परंतु प्रत्यक्षात रुग्णांना वेळेत उपचारही मीळत नाही आहे. इतर आजार झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यासही अडथळे निर्माण होत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांनाही कित्येक तास रुग्णवाहिकेची वाट पाहावी लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here