चंद्रपूर जिल्ह्यातील उमेद अभियाना कार्यरत सर्व केडर यांचा मानधन उपलब्ध करुन देण्यात यावा – आ. किशोर जोरगेवार
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
चंद्रपूर : – सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे की ,निधी अभावी चंद्रपूर जिल्हातील उमेद अभियाना अंतर्गत कार्यरत असलेल्या केडरचे मानधन थकीत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हे काम सुरळीत सुरु राहण्यासाठी सदर सर्व केडरचा मानधन निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन केली असून सदर मागणीचे निवेदन दिले आहे. ना. हसन मुश्रीफ यांनी याची तात्काळ दखल घेत निधी संदर्भातील प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांना केल्या आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे काम सुरु असून ग्रामीण भागाला या अभियानाचा मोठा लाभ होत आहे. विविध प्रकारच्या प्रेरीका या अभियानाचा पाया आहे. त्यांना मुल्यांकना नुसार प्रति महिना मानधन दिले जाते. मात्र कोरोना महामारी काळात ग्रामीण भागात स्वयंसहायता समूह, ग्रामसंघाकरिता विविध कामे करणार्या प्रेरीकेचे मानधन दिले गेलेले नाही. राज्य कक्षाकडून मागील दोन वर्षापासून या योजनेकरिता पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने प्रेरीकांचे मागील १८ महिन्यांपासून मानधन देण्यात आलेले नाही. जिल्हा कक्षांच्या वार्षिक आराखड्यापैकी ५० टक्के निधीही गतवर्षी देण्यात आले ग्रामीण भागात जीवनॉनती अभियानाचे काम सुरू असून ग्रामीण भागाला या अभियानाचा मोठा लाभ होत आहे