सम्यक बुद्ध विहार व श्रावस्ती बुद्ध विहार येथे दान पेटी फोडून नेली ३० ते ४० हजाराची रक्कम

57

सम्यक बुद्ध विहार व श्रावस्ती बुद्ध विहार येथे दान पेटी फोडून नेली ३० ते ४० हजाराची रक्कम

सम्यक बुद्ध विहार व श्रावस्ती बुद्ध विहार येथे दान पेटी फोडून नेली ३० ते ४० हजाराची रक्कम
सम्यक बुद्ध विहार व श्रावस्ती बुद्ध विहार येथे दान पेटी फोडून नेली ३० ते ४० हजाराची रक्कम

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट ०७/०९/२१ सम्यक बुद्ध विहार व श्रावस्ती बुद्ध विहार येथे झालेल्या चोरीबद्दल वार्डातील नागरिकांची मने दुखावले गेले आहेत,शहरात रोज सर्राट चोरीचे प्रमाण वाढत चालले असुन यावर पोलीस प्रशासनाने गंभीरतेने लक्ष आवरून वॉर्डातल्या व शहरातल्या नागरिकांच्या मनातील भीतीला अंकुश लागेल अशी उपाययोजना करावी.
सामाजिक कार्यकर्ता :-विकी वाघमारे व वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख (माहिती अधिकार,पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना)
हिंगणघाट येथील सम्यक बुद्ध विहार प्रबुद्ध नगर व श्रावस्ती बुद्ध विहार प्रज्ञा नगर येथे काल रात्री अज्ञान व्यक्तींनी दानपेटी फोडून जवळपास दोन्ही विहाराच्या दानपेटीतील जवळपास ३० ते ४० हजार रुपय असलेले पैसे नेल्याचे वार्डातील नागरिकांना निदर्शनात आले.
रामनगर वार्डातील नागरिकांनी पाहणी केली असता सम्यक बुद्ध विहाराच्या गेटचे कुलूप तोडून असल्याचे लक्षात आले,त्या वेळी काही नागरिकांनी पोलिसांना फोन द्वारे माहिती दिली व झालेल्या चोरीच्या घटनेबद्दल त्यांनी फोनवर पोलीसांना
कळवले.
पोलिसांना माहिती मिळताच हिंगणघाट पोलीस घटनास्थळ सम्यक बुद्धविहार प्रबुद्ध नगर येथे पोहोचले,पहाणी करून झालेल्या चोरीबद्दल पंचनामा केला.
तर दोन्ही वार्डातील नागरिकांनी पोलीस स्टेशन
येथे जाऊन तक्रार दिली.
सम्यक बुद्ध विहार रामनगर वार्ड व श्रावस्ती बुद्ध विहार प्रज्ञा नगर येथे दोन्ही विहारामध्ये झालेल्या चोरी बद्दल पोलीस प्रशासन कसून चौकशी करून तपास करीत आहे.

हिंगणघाट शहरात चोरीचे प्रमाण वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,वाढत्या चोरीवर अंकुश बसेल का असे वॉर्डातील व शहरातील नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे.