नवभारत, नवराष्ट्र वृत्तपत्राचे प्रतिनिधी झाले ब्लैकमेलर, एका व्यक्तीने प्राशण केल विष. ===== मुख्य मुद्दे ===== ● समुद्रपूर येथील नवभारतच, नवराष्ट्रच्या पत्रकार प्रताप. ● ब्लैकमेलर पत्रकारामुळे प्राशन केल विष. ● कधी पर्यत होणार जिल्हातिल बोगस पत्रकारावर कारवाई? ● वर्धा जिल्हा मोठ्या प्रमाणावर आल बोगस पत्रकाराच पीक?

56

नवभारत, नवराष्ट्र वृत्तपत्राचे प्रतिनिधी झाले ब्लैकमेलर, एका व्यक्तीने प्राशण केल विष.

===== मुख्य मुद्दे =====
● समुद्रपूर येथील नवभारतच, नवराष्ट्रच्या पत्रकार प्रताप.
● ब्लैकमेलर पत्रकारामुळे प्राशन केल विष.
● कधी पर्यत होणार जिल्हातिल बोगस पत्रकारावर कारवाई?
● वर्धा जिल्हा मोठ्या प्रमाणावर आल बोगस पत्रकाराच पीक?

नवभारत, नवराष्ट्र वृत्तपत्राचे प्रतिनिधी झाले ब्लैकमेलर, एका व्यक्तीने प्राशण केल विष. ===== मुख्य मुद्दे ===== ● समुद्रपूर येथील नवभारतच, नवराष्ट्रच्या पत्रकार प्रताप. ● ब्लैकमेलर पत्रकारामुळे प्राशन केल विष. ● कधी पर्यत होणार जिल्हातिल बोगस पत्रकारावर कारवाई? ● वर्धा जिल्हा मोठ्या प्रमाणावर आल बोगस पत्रकाराच पीक?
नवभारत, नवराष्ट्र वृत्तपत्राचे प्रतिनिधी झाले ब्लैकमेलर, एका व्यक्तीने प्राशण केल विष.
===== मुख्य मुद्दे =====
● समुद्रपूर येथील नवभारतच, नवराष्ट्रच्या पत्रकार प्रताप.
● ब्लैकमेलर पत्रकारामुळे प्राशन केल विष.
● कधी पर्यत होणार जिल्हातिल बोगस पत्रकारावर कारवाई?
● वर्धा जिल्हा मोठ्या प्रमाणावर आल बोगस पत्रकाराच पीक?

✒ प्रशांत जगताप/मुकेश चौधरी✒
9766445348
वर्धा/हिंगणघाट,दि.8 सप्टेंबर:- जिल्हातील हिंगणघाट तालुक्यातून एक खळबळजनक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. समुद्रपूर येथील पत्रकार मनीष गांधी व नवभारत वृत्तपत्राचे पत्रकार गजानन गावंडे यांच्या ब्लॅकमेलिंगला त्रासून हिंगणघाट येथील गौतम वार्ड मध्ये राहणा-या रवी कांबळे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामूळे सर्वीकडे अशा ब्लॅकमेलर पत्रकारावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

रवी कांबळे हे समुद्रपुर येथील ए.एस.के. हॉटेल याचे मालक असून, पत्रकार मनीष गांधी व गजानन गावंडे यांनी रवी कांबळे यांना ब्लॅकमेल करून खंडणी मागत होते. असे रवी कांबळे यांनी विष प्राशन करण्या अगोदर लिहुन ठेवलेल्या चिट्टीत समोर आले आहे.

रवी कांबळेनी लिहलेली चिट्टि…

“मी रवी चंद्रभान कांबळे ASK हॉटेलचा मी मालक आहे. पत्रकार मनिष राठी जी प्रतिनिधि गजानन गावंडे नवभारत नवराष्ट्र तसेच यांनी माझ्या हॉटेलच्या खोट्या आणि बोगस बातम्या आठ ते दहा दिवस सारख्या बातम्या लाऊन माझ्या हॉटेल विषयी चुकिची अफवा पसरवुन मला व माझ्या धंद्याला भरपुर प्रमाणात बदनाम केले आहे. तसेच यांनी मला पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती तरी मी त्यांना कसबसे कर्ज काढून 5000 रु मनिष गांधी आणि गजानन गावंदे यांना दिले होते. तरी सुद्धा यांनी 150 ते 200 कॉल करुन बाकीच्या पैशाची मला त्रास दिला माझ्या हॉटेलचे मुळ मालक यांना हॉटेलचे भाडे देण्याकरीता माझ्याजवळ काहिच पैसे नाहीत तसेच माझा हॉटेलवर काम करणा-या कामगांराना सुद्धा देण्यासाठी माझ्याजवळ पैसे नाहीत माझी परस्थिती अत्यंत हलाखीची असुन मी यांच्या त्रासामुळे सतत 8 ते 10 दिवसापासून खुप मानसीक त्रासामध्ये आहे. तरी आज मी खुप त्रासलो आहो आणि मी यांच्यामुळे आज दी. 08.09.2021ला आत्महत्या करित आहो माझ्या आत्महत्या करण्याला बोगस पत्रकार मनिष गांधी आणि गजानन गावंडे हे जाबबदार राहतील याच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी.”
रवि चंद्रभान कांबळे
हिंगणघाट

माघील काही दिवसा पासून समुद्रपुर मधील पत्रकार हे हॉटेल मालक रवी कांबळे याच्या हॉटेलला बदनाम करण्याची धमकी देत खंडणी मागत होते. त्यात हॉटेल मालक रवी कांबळेनी या ब्लॉकमेलर पत्रकारांना 5000 हजार रुपये दिले. पण या पत्रकाराची भुक भागायच नावच नाही घेत होत. 5000 दिल्यानंतर पण हे पत्रकार रवी कांबळेला अजुन जास्त पैसाची मागं केली आणि म्हणाला मला बाकीचे पैसे पण पाहिजे मला माझ्या संपादक नवभारत आणि गजानन गावंडे याला द्यायचे आहे.

अशा खंडणी बहादूर पत्रकारांना त्रासून रवी कांबळे यांनी यांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. पण न्याय मिळत नसल्याचे पाहुण तो माघील काही दिवसा पासून तणावात होता. त्यामूळे आज रवीने टोकाचे पाऊल उचलले विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

दि. 8 सप्टेंबर ला दुपारी 2 वाजताच्या सुमारास रवी कांबळने आपल्या घरी असलेल्या विषारी औषधी मोठ्या प्रमाणात प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यांना तुरंत हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात येथे नेण्यात आले होते पण डॉक्टरानी त्यांची स्थिती गंभीर असल्याचे सांगून सेवाग्राम येथील रुग्णालयात रेफर केले.

रवी कांबळेची परस्थिती गंभीर.
रवी कांबळे ला सेवाग्राम येथील रुग्णालयाच्या अतीदक्षता (आयसीयू) विभागात दाखल करण्यात आले आहे. त्याची तबीयेत खुप गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.