ऑनलाइन शादी डॉट कॉमवरील लग्न स्थळावर विश्वास करण पडले महाग! उच्चशिक्षित मुलीला साडेचार लाखांनी फसवल.

45

ऑनलाइन शादी डॉट कॉमवरील लग्न स्थळावर विश्वास करण पडले महाग! उच्चशिक्षित मुलीला साडेचार लाखांनी फसवल.

ऑनलाइन शादी डॉट कॉमवरील लग्न स्थळावर विश्वास करण पडले महाग! उच्चशिक्षित मुलीला साडेचार लाखांनी फसवल.
ऑनलाइन शादी डॉट कॉमवरील लग्न स्थळावर विश्वास करण पडले महाग! उच्चशिक्षित मुलीला साडेचार लाखांनी फसवल.

✒युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपूर:- आज काल मोठ्या प्रमाणात फसवणुक होण्याचा घटना सर्वीकडे वाढल्या आहे. त्यामूळे ऑनलाईन कुठलीही गोष्ट ही विचारपूर्वक करावी अशी महिती मिडिया वार्ता न्यूज जनहितात जारी करत आहे.

पुणे येथील एका कंपनीत इंजिनिअर असलेल्या मुलीने स्वता:च लग्न जुडण्या करिता शादी डॉट कॉम या ऑनलाइन साईडवर नोंदणी केली. काही दिवसांतच इंग्लंडमध्ये आर्किटेक्ट असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवले. भेटीला भारतात आल्याचे सांगून कस्टम अधिकाऱ्याने पकडल्याचे सांगून सुटका करण्यासाठी तरुणीकडून 4 लक्ष 22 हजार रुपये घेत फसवणूक केली. कमल बंजारी वय 29, रा. गुलमोहर अपार्टमेंट, टेका नाका नागपुर असे फसवणूक झालेल्या मुलीचे नाव आहे.

नागपुर येथील राहणारी कमल बंजारी ही तरुणी पुणे येथील इन्फोसीस कंपनीत अभियंता पदावर नोकरीवर होती. तिच्या वडिलांची प्रकृती बरी राहात नसल्याने दोन महिन्यांपूर्वी नोकरी सोडून ती नागपूरला आली होती. काही दिवसांपूर्वी तिने लग्नासाठी शादी डॉट कॉमवर आपल्या नावाची नोंदणी केली होती. 6 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 2 च्या सुमारास नार्वे (यूके) येथील विजय अभय खरे वय 31 वर्ष या तरुणाने कमलला लग्नासाठी रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर त्यांनी आपले मोबाईल क्रमांक एकमेकांना दिले. मी नार्वे येथे आर्किटेक्ट असून लवकरच मी भारतात स्थायिक होणार आहे असे सांगितले. कमलने त्याच्यावर विश्वास ठेवला. विजय लग्न करणार असल्यामुळे कमल खुश होती. तिने लग्नाचे स्वप्न बघने सुरू केले होते.

काही दिवसांनी एका महिलेने कमलला फोन केला. विजय खरे यास दोन कोटी रुपयांसह दिल्लीच्या कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले आहे. त्यामुळे त्याला दंड झाला आहे. दंड भरावा लागेल, अशी थाप मारली. कमलचाही त्यावर विश्वास बसला. कमलने 4 लक्ष 22 हजार रुपये पाठविले. तरीही पैशासाठी त्यांची मागणी सुरूच होती. कमलने विजयला फोन लावला असता त्याचा फोन बंद होता. अनेकदा प्रयत्न करूनही विजयचा फोन बंद येत असल्याने कमलला संशय आला. याप्रकरणी कोमलच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.