अमरावतीत लव्ह जिहादचा आरोप, खासदार नवनीत राणांचं पोलीस स्टेशनमध्ये राडा.

48

अमरावतीत लव्ह जिहादचा आरोप, खासदार नवनीत राणांचं पोलीस स्टेशनमध्ये राडा.

अमरावतीत लव्ह जिहादचा आरोप, खासदार नवनीत राणांचं पोलीस स्टेशनमध्ये राडा.

साधना पोकळे
✍ अमरावती शहर प्रतिनिधी ✍
8530436477

अमरावती: पीडित मुलीच्या कुटुंबाच्या तक्रारीनंतर नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठले. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांकडे संबंधित प्रकरण चौकशी केली तसेच आतापर्यंतच्या कार्यवाहीचे अपडेट मागितले. यावेळी पोलिसांनी तपास सुरु असल्याचं सांगत लवकरात लवकर मुलीची सोडवणूक करु, असं सांगितलं. त्याचवेळी नवनीत राणा यांनी पोलीस ठाणेदारावर गंभीर आरोप करत तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला, असा सवाल विचारला.नुकतेच आंतरधर्मीय लग्न झालेल्या हिंदू मुलीला तिच्या पतीने डांबून ठेवलं आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी माझ्याकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी पीडित मुलीला पोलीस स्टेशनमध्ये आणावं. पोलीस या प्रकरणी तपासाला एवढा उशीर का करतायेत, असा सवाल करत खासदार नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. तसेच त्यांचा फोन कॉल पोलीस ठाणेदाराने रेकॉर्ड केल्याने कोणत्या अधिकारात तुम्ही माझा फोन रेकॉर्ड केला अशी विचारणा करत त्या पोलिसांवर भडकल्या. जवळपास २० मिनिटे हा राडा सुरु होता. पोलिसांनीही आक्रमक भूमिका घेत राणांना तितकंच सडेतोड प्रत्युत्तर दिलं.पीडित मुलीच्या कुटुंबाच्या तक्रारीनंतर नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठले. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांकडे संबंधित प्रकरण चौकशी केली तसेच आतापर्यंतच्या कार्यवाहीचे अपडेट मागितले. यावेळी पोलिसांनी तपास सुरु असल्याचं सांगत लवकरात लवकर मुलीची सोडवणूक करु, असं सांगितलं. त्याचवेळी नवनीत राणा यांनी पोलीस ठाणेदारावर गंभीर आरोप करत तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला, असा सवाल विचारला. त्यावर पोलीस ठाणेदार ठाकरेंनी राणांचे आरोप फेटाळून लावले. २० मिनिटांपासून गोंधळ करणाऱ्या राणांना पोलीस स्टेशनबाहेर काढण्याचे आदेस तेथील वरिष्ठ पोलिसांनी दिले. त्यानंतरही राणांनी गोंधळ सुरुच ठेवला.

पोलिस स्टेशनमध्ये राडा
राज्य सरकारने तुम्हाला माझा फोन रेकॉर्ड करण्याचे अधिकार दिलेत का, हे मला सांगा, असे म्हणत नवनीत राणा यांनी प्रचंड आकांडतांडव केले. त्यामुळे या पोलीस स्टेशनमधील ठाणेदारांचा संयमही सुटला. त्यांनी नवनीत राणा यांना उद्देशून या सगळ्यांना आधी इथून बाहेर काढा, असे सांगितले. त्यामुळे नवनीत राणा आणखीनच संतापल्या. त्यांनी आणखी आक्रमकपणे पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारायाला सुरुवात केली. मात्र, पोलीस ठाणेदारानेही नवनीत राणा यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. संबंधित पोलीस ठाणेदारही आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आणि शेवटपर्यंत राणा यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत राहिला. अखेर नवनीत राणा आणि त्यांच्या समर्थकांना पोलीस ठाण्यातून बाहेर काढण्यात आले.