नवयुवक गणेश मंडळ जामगाव कडून भव्य रक्तदान शिबीर
ता.प्रतिनिधी मुलचेरा / महेश बुरमवार
मो.न.9579059379
मुलचेरा तालुक्यातील जामगाव येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आहे, गावातील सर्व लोक अगदी आनंदाने हा उत्सव दरवर्षी साजरा करतात व विविध सामाजिक उपक्रम राबविले जाते.. यावर्षी विविध ठिकाणी रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन गणेश मंडळ रक्तदान शिबीर घेण्याचे ठरविले..व दिनांक 06/09/2022 रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आली.. रक्तदान करणे किती श्रेष्ठ आहे, आपल्या रक्तदानाने कुणाचा जीव वाचू शकतो यावर मार्गदर्शन करण्यात आले, या रक्तदान शिबिरात 20 लोकांनी रक्तदान केले…या रक्तदान शिबीर आयोजनासाठी नवयुवक गणेश मंडळांनी खुप मेहनत घेतली…त्यात अक्षय डोके अध्यक्ष, राकेश ठोंबरे उपाध्यक्ष,शुभम धानोरकर कोषाध्यक्ष,अशोक जुनघरे सचिव , अरविंद निखाडे पोलिस पाटील,सुरेश आत्राम उपसरपंच, व्यंकटेश धानोरकर,अक्षय पोट , प्रविण पिपरे , व नवयुवक गणेश मंडळ जामगाव चे सर्व सदस्य,गावातील नागरिक उपस्थित होते.. अशाप्रकारे नवयुवक गणेश मंडळ जामगाव दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जातात.