भक्तीचा महासागर…
मुंबई शहर प्रतिनिधी : राकेश नवले
मोबाईल नंबर : 8097130040
उद्या आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा जाणार म्हणून त्यांना शेवटचे भेटण्याकरिता त्यांना शेवटचे पाहण्याकरिता त्यांची मनोभावे पूजा करण्याकरिता आज सगळे भाविक अनेक गणेश मंडळांनबाहेर गर्दी करताना पहावयास आले त्यामधील मुंबई मधील जगप्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याकरिता भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचे पहावयास आले . कोणी आपल्या लहान मुलाला दर्शन घेण्यासाठी घेऊन आले होते , कोणी आपल्या आईला बाप्पा दाखवायला घेऊन आले होते कोणी बापाकडे मागणे मागायला आले होते तर कोणी बाप्पाला आपले डोळे बघून पाहायला आले होते आजचा बाप्पाचा साज पाहता डोळे भावूक झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे सगळे पाहून आपण नक्कीच बोलू शकतो
काय तो राजाचा थाट…
काय ती भक्तांची गर्दी…
आणि काय त्यांची ती श्रद्धा…
एकदम okkk…❤