महाड मध्ये संविधान सुरक्षा अभियानाचे आयोजन
किरण बाथम
रोहा तालुका प्रतिनिधी
7020541776
भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे. या संविधानाची सुरक्षा व त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. संविधान सुरक्षा अभियानाचे निमंत्रक हबीब फकी यांचे वतीने महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील बहुउद्देशीय सभागृहात रविवार दि. ११ सप्टेबर रोजी सकाळी १० वा. संविधान सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हे दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार,
मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो.
संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी,
धर्मनिरपेक्ष,आणि लोकशाही प्रजासत्ताक
घोषित करते, तेथील नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते.
या संविधान सुरक्षा अभियानामध्ये सुषमा अंधारे, माजी खासदार हुसैन दलवाई, राजरतन आंबेडकर, माजी खासदार मौलाना उबेदुल्ला आझमी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .