अबब 😱🥺😳चक्क…रोबोट बनला कंपनीचा सीईओ
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351
बीजिंग : एखाद्या साय-फाय चित्रपटाप्रमाणेच एका चिनी मेटाव्हर्स कंपनीने चक्क रोबोटची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मल्टिप्लेअर ऑनलाइन गेम विकसित आणि ऑपरेट करणाऱ्या, तसेच मोबाइल ॲप्लिकेशन बनवणाऱ्या ‘नेटड्रॅगन वेबसॉफ्ट’ कंपनीने अलीकडेच आपली मुख्य उपकंपनी, ‘फुजियान नेटड्रॅगन वेबसॉफ्ट’चे नवीन सीईओ म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित आभासी मानवीय रोबोट ‘मिस तांग यू’ची नियुक्ती जाहीर केली. ‘मिस तांग यू’ कार्यकारी पद धारण करणारा जगातील पहिला रोबोट ठरला. (वृत्तसंस्था)