आम्ही देतो ते निमूटपणे खा आणि डॉक्टरला पैसे तुम्हीच भरा.

62

आम्ही देतो ते निमूटपणे खा
आणि डॉक्टरला पैसे तुम्हीच भरा.

आम्ही देतो ते निमूटपणे खा आणि डॉक्टरला पैसे तुम्हीच भरा.

✍शहनवाज मुकादम ✍
रोहा शहर प्रतिनिधी
📞 79724 20502📞

रोहा :-रोहा तालुका धान्य वितरण व्यवस्थेकडे दोन दिवसांपूर्वीच लक्षवेधून देखील शासन ढीमपणे
असल्याचे आणि गावपुढारी पध्दतशीरपणे कानाडोळा करतानाचे चित्र समोर आले आहे.आम्ही देतो ते निमूटपणे खा आणि डॉक्टरला पैसे तुम्हीच भरा असा संदेशच जणू या परिस्थितीतून दिसून येतो आहे.वाटले होते या गंभीर बाबीकडे जाणिवपूर्वक पाहिले जाईल पण कसले काय आणि कसले काय जे चालले आहे ते निमुटपणे सहन करण्याशिवाय रोहे तालुक्यातील जनतेला पर्याय शिल्लक राहिलेला दिसत नाही.
कुठेही उद्रेक नाही कि काही नाही
सर्व कसे शांत शांत आहे किनाही गंमत.
छायाचित्रात लोडींग अनलोडींग करतांना जे धान्य सांडते ते डुक्कर मनसोक्त खात असतात आणि उरलेले परत गोणीत भरून
थप्पीत लावले जाते.आहे किनाही गंमत.शिवाय जागोजागी डबकी आहेतच हि दुसरी गंमत.
रोहा तहसीलदारांनी या गंभीर बाबीकडे जाणिवपूर्वक पाहिले पाहिजे आणि लोकांना स्वच्छ धान्य पुरवठा कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.