जळगाव जिल्ह्यातील ड्रायव्हिंग लायसन्स स्मार्ट कार्ड त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी, नैसर्गिक मानवधिकार सुरक्षा परिषदने केली मागणी

मन्सूर तडवी

चोपडा प्रतिनिधी

जळगाव: दिनांक ६ ऑक्टोबर रोजी नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद तर्फे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव श्याम लोही यांना जळगाव जिल्ह्यातील टू व्हीलर फोर व्हीलर लायसन धारकांना स्मार्ट कार्ड त्वरित उपलब्ध करून देण्या संदर्भात भेट घेतली असता आरटीओ कार्यालयाचे सहाय्यक मोटर निरीक्षक सुनील गुरव यांना जिल्हाध्यक्ष डॉक्टर शरीफ बागवान यांनी निवेदन देऊन सादर केले आणि आपल्या कार्यालयातून टू व्हीलर फोर व्हीलर चे ड्रायव्हिंग लायसन्स स्मार्ट कार्ड पक्के लायसन्स घेण्यासाठी अर्ज केले असता सर्व प्रक्रिया पूर्ण करून होऊन सुद्धा स्मार्ट कार्ड पक्के (प्लास्टिकचे) लायसन्स मिळणयास विलंब होत आहे.

गेल्या सहा महिन्या पेक्षा जास्त कालावधीत नागरिकांना पक्के स्मार्ट कार्ड मिळत नसल्याचे निदर्शनात आले आहे. सदर स्मार्ट कार्ड साठी नागरिकांना कार्यालयात चक्रा माराव्या लागत आहे.काय अडचण आहे असे नागरिकांमध्ये बोलले जात असून संताप व्यक्त केला जात आहे लायसन्स काढून सुद्धा नागरिकांकडे प्रत्यक्ष हार्ड कॉपी जवळ नाही ट्राफिक हवालदारांनी लायसन तपासणी करिता मागणी केली असता दाखवण्यासाठी पण स्मार्ट कार्ड लायसन्स जवळ उपलब्ध नाही.

गणेशोत्सवानिम्मित अमेझॉनची खास ऑफर, नक्की पाहा.

म्हणजे या स्मार्ट कार्डाचे लायसन्स घेण्या करिता आरटीओ कार्यालयाचे चकरा मारावे लागत आहे व आपल्याकडून सांगण्यात येते की वरतूनच येत नाही प्रिंटिंग होत नाही असे सांगितले जाते. नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता आपण आपल्या पातळीवर काय समस्या आहे.त्याचा पूर्ण आढावा पाठपुरावा करून स्मार्ट कार्ड ( प्लास्टिकचे कार्ड) सप्लाय करणारी कंपनी /ठेकेदार यांना पाचारण करून त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश काढावे व योग्य ती कारवाई करावी व संबंधित कॉन्ट्रॅक्टर ला आदेश पारित करावे व लोकांची गैरसोय दूर करावी असे निवेदन माननीय जिल्हाधिकारी सो जळगाव .माननीय श्याम लोही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव. माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी धुळे. यांना सादर करण्यात आले आहे असे डॉ शरीफ बागवान जिल्हाध्यक्ष नैसर्गिक मानवधिकार सुरक्षा परिषद जळगाव यांनी निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here