माणगांव शहरात बहरणार मियावाकी जंगल सामाजिक वनीकरण मार्फत २० गुंठ्यात ६००० रोपांचे रोपण 

सचिन पवार 

कोकण ब्युरो चीफ

मो: 808009230

रायगड :-सामाजिक वनीकरण विभागामार्फत माणगांव तालुक्यात मौजे नाणोरे येथे २० गुंठे क्षेत्रात विभागीय वनअधिकारी रायगड-अलिबाग, स्वप्नील घुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रजातीच्या एकूण ६००० रोपांचे अटल आनंदवन घन प्रकल्प (मियावाकी) योजने अंतर्गत रोपण करण्यात येत आहे, त्याची सुरुवात सोमवार दि ४ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. माणगांवचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वृक्षारोपणास सुरुवात करून एकूण प्राथमिक स्वरूपात सध्या २००० रोपांचे रोपण करण्यात आले आहे. 

सदर कार्यक्रम माणगांव सामाजिक वनीकरण वनक्षेत्रपाल निलेश मोरे, माणगांव प्रादेशिक वनक्षेत्रपाल अनिरुद्ध ढगे, सामाजिक वनीकरण वनपाल शरद धायगुडे, वनरक्षक अर्जुन सोनावणे व वन विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती पार पडला.झपाट्याने वाढत्या व विकसित होत्या माणगांव शहरास या मियावाकी पद्धतीच्या जंगलाचा नक्कीच भविष्यात फायदा होईल असे नागरिकांकडून बोलले जात आहे, मौजे नाणोरे येथील सदर जागेत वनविभागाचे नवीन माणगांव प्रादेशिक कार्यालय देखील काही महिन्यातच सुरु होत असल्याने मियावाकी जंगलामुळे परिसर अधिक बहरेल, शहरात मियावकी जंगलाचा आसरा अनेक पक्षी, फुलपाखरे, किट-पतंगे घेतील व त्यांच्यासाठी एक चांगले नैसर्गिक निवासस्थान तयार होईल.

        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here