ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचे मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचे विधान

अश्विन गोडबोले

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर, 8 सप्टेंबर: सध्या राज्यात विशेषतः मराठवाड्यात ओबीसी समाजात मराठा समाजाचा समावेश करून आरक्षण देण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र निजामशाहीतील रेकॉर्ड तपासून कुणबी निकष पूर्ण करणाऱ्या कुणबी समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध नाही, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्यांना याअगोदर पण ओबीसी म्हणून प्रमाणपत्र मिळतच होते, त्याला आमचा विरोध नाहीच.

• मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या विरोधात आम्ही नाही परंतू मराठ्यांचा सरसकट ओबिसीत समावेश करू नये : ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

• घटना दुरुस्ती करून ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण वाढवून द्यावे 

• कुणबी-मराठा, मराठा-कुणबी यांना ओबीसी चे प्रमाणपत्र मिळतच आहे : डॉ. अशोक जिवतोडे

मात्र सरसकट सर्व मराठ्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध आहे, प्रसंगी त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरीही त्यासाठी आमची तयारी आहे, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले. यात कुणीही राजकारण आणू नये असे देखील डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले, व हीच भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आहे.

गणेशोत्सवानिम्मित अमेझॉनची खास ऑफर, नक्की पाहा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here