शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा : प्रकल्प संचालक राजेंद्र निकम

54

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा : प्रकल्प संचालक राजेंद्र निकम

 

मीडियावार्ता 

इगतपुरी प्रतिनिधी: विविध रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची नापिकता वाढत आहे. नैसर्गिक विषमुक्त शेतीमुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासन डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन ही महत्वकांक्षी योजना राबवित आहे. शेतकऱ्यांचे गट तयार करून जैविक शेतीचे ज्ञान अवगत करून तीन वर्षांत शेतकरी उत्पादक कंपनी तयार करायचे शासनाचे महत्वपूर्ण उद्दिष्ट्ये आहे. जासीत जास्त शेतकऱ्यानी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी केले. इगतपुरीच्या तालुका कृषी विभागात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजना अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम नैसर्गिक / सेंद्रिय शेती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी श्री निकम बोलत होते. कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका कृषिअधिकारी रामदास मडके यांनी केली. 

इगतपुरी येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजना अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम नैसर्गिक सेंद्रिय शेती कार्यशाळेतून शेतकऱ्याना कृषी विभागाकडून मार्गदर्शन

गणेशोत्सवानिम्मित अमेझॉनची खास ऑफर, नक्की पाहा.

याप्रसंगी उपविभागीय कृषिअधिकारी गोकुळ वाघ, विभागीय संशोधन केंद्राचे हेमंत पाटील, उपसंचालक वंदना शिंदे,कृषी विज्ञान केंद्राचे विशेष विषय तज्ज्ञ मंगेश व्यवहारे, तालुका कृषिअधिकारी रामदास मडके आदींनी शेतकऱ्याना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत शेतीचे प्रमाणीकरण कसे करायचे, शेतकऱ्याना प्रशिक्षित करणे, समूह निवडून सेंद्रिय, नैसर्गिक शेती योजना पुढे कशी न्यायची आहे.उत्पन्नात वाढ करण्यासाठी शासनाचा उपक्रम असून विषमुक्त शेती करणे आरोग्यासाठी घातक आहे. ही योजना सहा जिल्ह्यात राबवली गेली असून आता राज्यभर राबवण्यात येत आहे. गोमूत्र व गोबर यापासून सेंद्रित शेती उपयुक्त असल्याचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी शेवटी सांगितले. मंडळ कृषी अधिकारी भास्कर गीते, संतोष सातदिवे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक किशोर भरते यांनी केले. आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी मनोज रोंगटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीे करण्यासाठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हितेंद्र मोरे,रावसाहेब पाटील यांनी प्रयत्न केल