ह्रितीकाचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव बॅरिस्टर नानी पालखीवाला सुवर्ण पदकावर उमटवली मोहर

ह्रितीकाचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
बॅरिस्टर नानी पालखीवाला सुवर्ण पदकावर उमटवली मोहर

ह्रितीकाचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव बॅरिस्टर नानी पालखीवाला सुवर्ण पदकावर उमटवली मोहर

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग :- अलिबागची कन्या ह्रितीका प्रशांत जन्नावार हीने अलिबागकरांची मान उंचावेल अशी कामागिरी केली आहे. तीने कौटुंबिक कायदा या विषयात सिम्बासिस आंतरराष्ट्रीय विद्यापिठात सर्वाधिक गुण मिळवत टॉपर येण्याचा बहुमान मिळवला आहे. तिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बॅरिस्टर नानी पालखीवाला सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आले. ह्रितीका ही अलिबागमधील प्रसिध्द डॉ. प्रशांत जन्नावर यांची कन्या आहे. तीने मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षा होत आहे.

सदरचा कार्यक्रम 3 सप्टेंबर 2024 रोजी पुण्यात पार पडला. याप्रसंगी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विद्यापिठातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
ह्रितीकाचे शिक्षण हे को.ए.सो. इंग्लीश मिडीयम स्कूल अलिबाग, तसचे आरसीएफ स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे झाले आहे. 12 वीला तीने विज्ञान शाखेतून 90 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती. त्यानंतर कायद्याच्या पदवी अभ्यासक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात प्रवेश घेतला. तीने बीएएलएलबी पदवी उच्च श्रेणीत संपादन केली. त्यानंतर एल.एल.एम.साठी कौटुंबिक कायदा या विषयाची निवड केली. त्या विषयात तीने अनन्यसाधारण यश संपादन केले. विद्यापिठात प्रथम येण्याचा मान मिळवत तीने यशाला गवसणी घातली. बॅरिस्टर नानी पालखीवाला या प्रतिष्ठीत सुवर्ण पदकाची ती मानकरी ठरली. नानी पालखीवाला हे भारतातील सुप्रसिध्द कायदे पंडित, घटना तज्ज्ञ तसेच अर्थ तज्ज्ञ होते. त्यांनी 1977 ते 1979 या कालावधीत भारताचे अमेरिकेतील राजदूतम्‌‍ म्हणन काम पाहीले होते. भारत सरकारने त्यांना 1998 साली पद्मविभूषण या सर्वोच्य नागरि सन्मानाने गौरवले होते. त्यांच्या नावाने असलेल्या सुवर्ण पदकाला कायदा क्षेत्रात प्रचंड आदराचे आणि प्रतिष्ठेचे स्थान आहे.
. .. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here