सीबीआयच्या माजी संचालकांने राहत्या घरात गळफास लटकलेल्या अवस्थेत आढळून आले, हत्या आत्महत्या?
एसपी शिमला मोहित चावला यांनी याबाबत माहिती दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार अश्विनी यांनी आत्महत्या केली आहे. मात्र, त्यांनी असे पाऊल उचलण्याचे कारण अद्यापसमजू शकलेले नाही.
शिमला:- सीबीआयचे माजी संचालक आणी मणिपूर व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार यांचे बुधवारी निधन झाले. शिमला येथील 70 वर्षीय अश्विनी कुमार आपल्या रहात घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. एसपी शिमला मोहित चावला यांनी याबाबत माहिती दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार अश्विनी यांनी आत्महत्या केली आहे. मात्र, त्यांनी असे पाऊल उचलण्याचे कारण अद्यापसमजू शकलेले नाही. हिमाचलच्या सिरमौर येथे राहणारे अश्विनी कुमार ही 1973 बॅचचे आयपीएस अधिकारी होती. सीबीआयचे संचालक, हिमाचल प्रदेशचे डीजीपी याच्यासह अनेक पदांवर त्यांनी कामगिरी वाजवली आहे.
हिमाचल पोलिसात डीजीपी असताना कित्येक मोठ्या सुधारणा केल्या 2006 साली हिमाचल प्रदेश पोलिसांच्या डीजीपीचा कार्यभार घेतल्यानंतर अश्विनी यांनी येथे अनेक सुधारणा केल्या. हिमाचल पोलिसांचे डिजिटलायझेशन आणि स्टेशन स्तरावर संगणकाचा वापर त्यांनी सुरू केला. त्यांच्या कारकिर्दीतच तक्रारींची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली, यामुळे दुर्गम भागातील रहिवाशांना पोलिस ठाण्यात धाव न घेता ऑनलाईन तक्रार देणं सोईस्कर झालं.
सीबीआयचे संचालक होणारे हिमाचलचे पहिले पोलिस अधिकारी
अश्विनी कुमार जुलै 2008 मध्ये सीबीआय संचालक बनले होते. अश्विनी हिमाचल प्रदेशातील सीबीआय संचालक म्हणून काम करणारी पहिली पोलिस अधिकारी होते. मे 2013 मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने प्रथम त्यांना नागालँडचे राज्यपाल केले आणि त्यानंतर जुलै 2013 मध्ये त्यांना मणिपूरचे राज्यपाल देखील केले होते.