यवतमाळ जिल्हातील वणी कोंबड बाजारावर पोलिसाचा छापा.

अवैध जुव्वा कोंबड बाजार; नऊ आरोपी ताब्यात, सात लाखांचा मुद्देमाल जप्त

 

यवतमाळ:-  जिल्हातील वणी शहराला लागून असलेल्या खुल्या मोकळ्या मैदानात अवैध सुरू असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास येथील विठ्ठलवाडी येथे करण्यात आली.
अतुल बोबडे वय 35, रा. कनकवाडी, खुशाल मोहितकर वय 33, रा. विठ्ठलवाडी, मंगेश ठेंगणे वय 33, रा. विठ्ठलवाडी, राहुल फुटाणे वय 30, रा. शेगाव, जि. चंद्रपूर, बंडू ढेंगडे रा. वरोरा, सुभाष मोते वय 29, रा. गणेशपूर, प्रवीण पराते वय 32, रा. बोर्डा, ता. वरोरा, संकेत ठाकरे वय 22, रा. विद्यानगरी अशी जुगार खेळणाऱ्यांची नावे आहेत.
वणीच्या विठ्ठलवाडी परीसरातील मोकळ्या मैदानात अवैध जुव्वा कोंबड बाजार सुरू असल्याची टीप पोलिसांना मिळाली. त्यावरून हा छापा टाकण्यात आला. घटनास्थळावरून जुगारींसह तब्बल 16 जिवंत कोंबडे ताब्यात घेण्यात आलीत. यावेळी दुचाकी व चारचाकी वाहनांसह 22 हजार 130 रुपयांची रोकड असा एकूण सात लाख 37 हजार 30 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, प्रभाकर, सुदर्शन वानोळे, प्रकाश गोरलेवार, सुनील कुंटावार, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पंकज उंबरकर, दीपक वांड्रसवार,जयार रोगे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून संजय पुज्जलवार यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. लगेच दुसऱ्या दिवशी कोंबड बाजारावर छापा टाकल्याने अवैध व्यावसायिकांत धडकी भरली आहे. एसडीपीओ पुज्जलवार यांचा यापूर्वी एलसीबी, एसडीपीओ म्हणून जिल्ह्यात कार्यकाळ गेला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here