मुलांनी केला मद्यपी वडीलाची हत्या. मृतक आईचा सतत करत होता छळ
लातूर:– जिल्हातील बेलकुंडमध्ये मुलाने वडीलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. मद्यपी पित्याकडून आईचा सतत छळ होत असल्याच्या कारणावरुन दोघा मुलांनी पित्याचा खून केल्याची घटना औसा तालुक्यातील सिंदाळावाडी येथे घडली. याप्रकरणी बुधवारी पहाटेच्या सुमारास कृष्णा गरड याला अटक करण्यात आली. त्यास औसा येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या माहिती नुसार, औसा तालुक्यातील शिंदाळावाडी शिवारात मच्छिंद्र काशीनाथ गरड 43 यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला होता. दरम्यान, गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. याबाबत भादा पोलीस ठाण्यात काशीनाथ गरड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील एकाला पोलिसांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याला औसा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.