मूर्तिजापूर आई आणी मुलीने रेल्वे रुळावर झोपून संपविली जीवनयात्रा
अकोला:- जिल्हातील मूर्तिजापूर मध्ये आई आणी मुलीने रेल्वे रुळावर झोपून जीवनयात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे सर्वीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मूर्तिजापूर रेल्वे स्थाकावरील रात्री जवळपास सव्वा अकरा वाजताची वेळ होती, वय वर्षे 55 आणि वय वर्षे 30 अशा दोन महिला रेल्वे स्थानकावर येतात. अन चक्क रेल्वे रुळावर झोपून स्वतःची जीवनयात्रा संपवतात. आणि सर्वत्र चर्चांना उधान येते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास करण्यासाठी सीसीटीव्हीचा आधार घेतल्या जातो. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तपास करताना दोन्ही महिला पश्चिम दिशेने येऊन प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर बसलेल्या दिसल्या. रेल्वे गाडी येण्यापूर्वी रुळावर जाऊन झोपल्याचे व त्यांचे देह छिन्नविछीन्न झाल्याचे निदर्शनास आले. त्या दोघी मायलेकी असल्याची चर्चा परीसरात होती.
वंदे मातरम आपात्कालीन पथकाचे सेनापती पुंडलिक संगले, अक्षय सूर्यवंशी, सोनू चौधरी, गौतम डींडोरे, सागर वांदे यांना मदतीसाठी पाचारण करण्यात आले.
त्यांनी दोन्ही मृतदेह शव विछच्छेदनगृहात उत्तरीय तपासणीसाठी नेले. पुढील तपास ठाणेदार किरण कालवे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र जळमकर व हवालदार शेख कलीम करीत आहेत.