भाचीवर बलात्कार करून नराधम मामाने केली आत्महत्या

56

भाचीवर बलात्कार करून नराधम मामाने केली आत्महत्या

खामगाव :- आज देशात आणी राज्यात 1 वर्षा पासुन ते 70 वर्षा परन्तच्या महिला सुरक्षित नसल्याच्या आज अत्याचारच्या घटनान वरुन दिसून येत आहे. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना खामगाव तालूक्यात घडली आहे.
अंगणात खेळत असलेल्या ५ वर्षीय चिमुकल्या भाचीवर नराधाम मामाने अत्याचार करून मामा – भाचीच्या पवित्र नात्याला काळीमा फासला. ही संतापजनक घटना तालुक्यातील कदमापूर येथे उघडकीस आली. बलात्कारानंतर नराधम मामाने स्वत:च्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली.
तालुक्यातील कदमापूर येथील 5 वर्षीय चिमुकली 5 आॅक्टोबर रोजी दुपारी अंगणातील पलंगावर खेळत होती. दरम्यान, तिच्या मामाने चिमुकलीला उचलून घरात नेवून तिच्यावर अत्याचार केला. यावेळी घाबरलेल्या चिमुकलीने रडत जावून तिच्या आजीला घडलेला प्रकार सांगितला.तिच्या आजीने सोमवारी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम 376 (2)(आय) भादंवी सह कलम 4, 6 लैगिंक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आपल्या विरोधात पोलिसात तक्रार दिल्याची माहिती कळताच आरोपीने बदनामीला घाबरून स्वत:च्या शेतात सोमवारी दुपारी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
हा प्रकार दुपारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनाना केला. सोबतच याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलिस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्हयात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून पोलिसांसमोर या घटना रोखण्याचे आव्हान आहे.