हिंगणघाट माजी आमदाराच्या पुत्राने तलाठ्याच्या मानेवर तलवार ठेवून हल्ला करण्याचा प्रयत्न.

हिंगणघाट माजी आमदाराच्या पुत्राने तलाठ्याच्या मानेवर तलवार ठेवून हल्ला करण्याचा प्रयत्न.

हिंगणघाट माजी आमदाराच्या पुत्राने तलाठ्याच्या मानेवर तलवार ठेवून हल्ला करण्याचा प्रयत्न.
हिंगणघाट माजी आमदाराच्या पुत्राने तलाठ्याच्या मानेवर तलवार ठेवून हल्ला करण्याचा प्रयत्न.

आशिष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
वर्धा :- वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यातील पारडी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पारडी या गावात माजी आमदाराच्या पुत्राने अवैध गौण खनिज तपासणी करत असलेल्या तलाठ्याच्या मानेवर तलवार ठेवून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने हिंगणघाट तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची तक्रार हिंगणघाट पोलिसांत दाखल झाली असून आरोपी फरार असल्याची माहिती हिंगणघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार संपत चव्हाण यांनी दिली.

दि.5 ऑक्टोबर रोजी तलाठी रवींद्र वाघ हे पारडी येथे अवैध गौणखनिज उत्खननाबाबतची तपासणी करीत असताना वाळू भरलेले दोन ट्रॅक्टर त्यांना येताना दिसले. त्यांनी चालकाला वाहतूक परवान्याची विचारणा केली असता ट्रॅक्टरचालकाने परवाना नसल्याचे सांगितले. तलाठी वाघ यांनी ट्रॅक्टरचा जप्ती नामा तयार केला. आणि ट्रॅक्टरची जप्ती कारवाई सुरु होती.

त्याच दरम्यान, काही वेळाने एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकीतून माजी आमदार राजू तिमांडे याचा मुलागा हिंगणघाट नगर पालिकेचा नगरसेवक सौरभ तिमांडे हा चार ते पाच जणासह घटनास्थळी आला. त्यांच्या हातात काेयता, तलवारी होत्या. नगरसेवक सौरभ तिमांडे याने तलाठी वाघ यांच्या मानेवर तलवार ठेवून त्यांना जिवे मारण्याची धमकी देत ट्रॅक्टर सोडण्यास सांगून त्यांच्या समक्ष दोन्ही ट्रॅक्टर पळवून नेले. याप्रकरणी तलाठी वाघ यांनी हिंगणघाट ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

माजी आमदार राजू तिमांडे याचा मुलगा सौरभ तिमांडे याच्यावर यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तो गुंडगिरी प्रवृत्तीचा असून तीन ते चार प्रकरणांमध्ये त्याच्यावर गुन्हा देखील झालेला असल्याचे हिंगणघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार संपत चव्हाण यांनी सांगितले.

आरोपीला पकडण्यासाठी दोन पथके रवाना.
आरोपी नगरसेवक सौरभ तिमांडेसह इतर चार जण ही घटना घडल्यापासून फरार आहेत. आरोपींचे शोधकार्य सुरू असून त्यांना पकडण्यासाठी दोन पथके रवाना झाली आहे. प्रत्येक पथकात एक पीएसआय आणि कर्मचारी असल्याची माहिती असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे ठाणेदार चव्हाण यांनी सांगितले.