नागपूर: अल्पवयीन मुलीवर 7 नराधामाने केलेल्या सामूहिक बलात्काराने हादरलं

नागपूर: अल्पवयीन मुलीवर 7 नराधामाने केलेल्या सामूहिक बलात्काराने हादरलं

नागपूर: अल्पवयीन मुलीवर 7 नराधामाने केलेल्या सामूहिक बलात्काराने हादरलं
नागपूर: अल्पवयीन मुलीवर 7 नराधामाने केलेल्या सामूहिक बलात्काराने हादरलं

युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपूर,दि.08:- नागपुर येथून एक संतापजनक महिती समोर आली आहे. नागपुर मध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं नागपूर हादरलं आहे. त्यामूळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नागपुर मध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सात नराधम आरोपींनी बलात्कार केल्याची महिती समोर आली आहे. नागपूरच्या एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या इसासनी परिसरात ही खळबळजनक घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अद्यापही तीन आरोपी फरार आहेत.

नागपुरातील एमआयडीसीच्या इसासनी परीसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली. पिडित 17 वर्षीय मुलगी आपल्या मित्रासोबत याठिकाणी गेली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीचा मित्र तिला सोबत घेऊन तीन दिवसांपासून देह व्यापार करत होता. गुरुवारी देखील तिला ग्राहकांकडे घेऊन गेला होता. दरम्यान, सात आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी मित्राला मारहाण करून मुलीवर बळजबरीने सामूहिक बलात्कार केला. यावेळी पीडितेने प्रतिकार केला असता तिला आणि तिच्या मित्राला मारहाण करण्यात आली. त्यानंतर इसासनी परिसरात जोरदार भांडण झाल्यावर. वादाची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच इसासनी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पीडितेने स्वतःची आपबीती सांगितली. त्यावरून पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून मुलीच्या मित्रासह चार आरोपींना अटक केली आहे. पोलिस अद्याप तीन आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत असल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त यांनी सांगितले.