भाऊ नाही बोलला तरी बहीण बसली प्रेमीच्या बाईकवर, मग झाल अस काही सर्व संपल.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपूर:- नागपुर मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त भावाने बहिणीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराचा कैचीने भोसकून हत्या केला. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. जरीपटका पोलिसांनी अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले आहे. मलकियसिंग जसबीरसिंग वर्मा वय 20 वर्ष, रा. बाबा दीपसिंगनगर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
मयत मलकियसिंग हा मूळचा पंजाबचा रहवासी होता, त्याला तीन बहिणी आणि आई आहे. त्याच्या बहिणींचे लग्न झाल्यानंतर तो जरीपटका परीसरात आईसोबत राहत होता. त्याचे वस्तीत राहणाऱ्या शितल (बदललेले नाव) हिच्याशी त्याचे सुत जुडले. मयत मलकियसिंग याची प्रेमीका असलेली शितलला लहान भाऊ आणि आई आहे. दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती शीतलच्या आईला झाली. त्यानंतर शितलने मलकियसिंगची ओळख आई व भावाशी करून दिली. तेव्हापासून तो शितलच्या घरी ये-जा करायला लागला.
शितल आणि मलकियसिंग यांच्या प्रेमाची चर्चा परिसरात होती. त्यामुळे शितलचा भाऊ नेहमी तिच्यावर चिडत होता. शितल फार्मसीत नोकरीवर लागली. तिचे आणि मलकियसिंगचे प्रेमसंबंध वाढले. त्यामुळे मलकियसिंग हा तिला रोज फार्मसीत पोहोचवून देत होता आणि घरी आणत होता. मलकियतसिंगचे शितलच्या घरी ये-जा होती.
5 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मलकियतसिंग हा प्रेयसी शितलच्या घरी आला आणि प्रेयसी शितलला बाहेर फिरायला जाऊ अस बोलला. शितल पण याला तयार झाली. दोघेही बाहेर जाण्याच्या तयारीत असताना भावाने बहिणीला बाहेर जाण्यास मनाई केली. त्यावरून मुलगा आणि मयत मलकियतसिंग यांच्यात वाद झाला. ‘तेरी बहन रात में मेरे साथ के लिए तयार हैं, तो तुझे क्या प्रॉब्लेम हैं?’ असा प्रश्न केला. त्याने आईला विचारून बहिणीला घेऊन जा, अशी अट टाकली. त्यामुळे दोघांत पुन्हा वाद झाला.
तोपर्यंत शितल ही मलकियसिंग याच्या दुचाकीवर बसली आणि निघून जाण्याच्या तयारीत होती. दरम्यान मुलाने घरात ठेवलेली कैची आणली आणि मलकियतसिंगच्या पोटात आणि छातीत खुपसली. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून विधी संघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करत होती.