दफन भुमी साठी आदिवासी एकता परीषद ग्राम समिती मार्फत सामरोद ग्रामपंचायतीला दिले लेखी निवेद

✒ ईसा तडवी ✒
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
जामनेर तालुक्यातील जवळच
आज दिनांक 07ऑक्टोबर
2021रोजी आदिवासी एकता परिषद ग्राम समितीच्या सामरोद च्या वतीने ग्रामपंचायत ला लेखी निवेदन देण्यात आले आदिवासी भिल्लसमाज आदिवासी यज्ञसंस्कृती प्रथा परंपरा नुसार जीवन जगतात मग ते लग्नविधी असो या मरण विधी.आदिवासी संस्कृती प्रमाणे केली जाते परंतु सामरोद या गावांमध्ये आदिवासी भिल्ल समाजासाठी प्रेत दफन करण्यासाठी दफन भूमी उपलब्ध नाही म्हणून आदिवासी एकता परिषद *जिल्हा संपर्कप्रमुख माननीय दादासो सुधाकर भाऊ सोनवणे व तालुका अध्यक्ष लहू दादा मोरे* यांच्या मार्गदर्शनाखाली सामरोद ग्रामपंचायत
मा.ग्रामविकास सो.अधिकारी व मा.सरपंच सो.यांना आदिवासी भिल्ल समाजाला दफनभूमी साठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी ठराव करून जागा उपलब्ध करून देणे बाबत आदिवासी एकता परिषद ग्राम समिती अध्यक्ष हिरालाल मोरे शरद सोनवणे रितेश मोरे शांताराम सोनवणे विजय सोनवणे सागर भील व आदी. समाज बांधव यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले…