*ऑक्सिजन प्लांटचे अहेरीत लोकार्पण!*
*आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते*
*आता ऑक्सिजनची टंचाई भासणार नाही*

*आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते*
*आता ऑक्सिजनची टंचाई भासणार नाही*
*📘✒अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335✒📘*
*अहेरी:-* कोरोना महामारीमुळे राज्यात ऑक्सिजनची टंचाई भासत होती ऑक्सिजन मुबलक प्रमाणात राहावे यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात नुकतेच ऑक्सिजन प्लांट बसविण्यात आले असून गुरुवार 7ऑक्टोबर रोजी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, वैद्यकीय अधीक्षक डॉ.कन्ना मडावी, कांती इंडस्ट्रीज दिल्ली येथील राजीव कौशिक,चंद्रपूर येथील टेक्निशीयन आशिष भंडारी, माजी जि.प.अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, शैलेश पटवर्धन , श्रीनिवास विरगोनवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी विधिवत पूजन करून नारळ फोडले. तदनंतर आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी ऑक्सिजन प्लांटचे यंत्र स्टार्ट करून प्लांटचे लोकार्पण केले.
यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत राज्यात ऑक्सिजनची भीषण टंचाई होती, ऑक्सिजन अभावी रुग्णांचे वेळेप्रसंगी जीव गेले. त्यामुळे ऑक्सिजन मुबलक प्रमाणात राहावे यासाठी आपलेही प्रयत्न होते, त्या दृष्टीने अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन यंत्र बसविण्यात आले असून ऑक्सिजनसाठी आता रुग्ण व नागरिकांना आता चिंता करण्याची गरज नसल्याचे म्हणत ऑक्सिजन हे प्राणवायू असल्याचे आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी बोलून दाखविले.
यावेळी सुरेंद्र अलोने, श्रीनिवास विरगोनवार, मांतय्या आत्राम, संतोष तोरे, सुमित मोतकूरवार आदी व प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.
*बॉक्स*
*बोरवेलचेही लोकार्पण!*
स्थानिक विकास निधी अंर्तगत आमदार निधीतून अहेरी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात बोरवेल बसविण्यात आले असून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते गुरुवारी बोरवेलचेही लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम व डॉ.कन्ना मडावी उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची योग्य सोय व्हावी यासाठी स्थानिक विकास निधीतून बोरवेल बसविण्यात आले असून आरोग्यासोबतच पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी व नागरिकांच्या सेवेसाठी आपण सदैव कटिबद्ध व तत्पर असल्याचे बोलून दाखविले.