ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत कोळसा वनपरिक्षेत्रातील विश्रामगृह दुरुस्तीच्या नावावर लाखोंचा भ्रष्टाचार ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून कारवाई करण्याची मागणी सहा. वनसंरक्षक कुलकर्णी यांचा भ्रष्ट कारभार उघड

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत कोळसा वनपरिक्षेत्रातील विश्रामगृह दुरुस्तीच्या नावावर लाखोंचा भ्रष्टाचार

ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून कारवाई करण्याची मागणी

सहा. वनसंरक्षक कुलकर्णी यांचा भ्रष्ट कारभार उघड

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

चंद्रपूर सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या कोळसा वनपरिक्षेत्रातील वन विश्रामगृह दुरुस्ती करण्याच्या नावाखाली कोणतेही अंदाजपत्रक वा ई-टेन्डरिंग न मागवताच शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च केला असून मोठी अफरातफर झाल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट उघड झाले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे सहा. वनसंरक्षक कुलकर्णी यांनी वन विश्रामगृहाची कथीत दुरुस्तीच्या नावाखाली तेथील वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल यांना विश्वासात न घेता वा शासनाच्या कोणत्याही प्रोसेस पार न पाडता आपल्या मनमर्जीने काम करुन शासनाचा लाखो रुपयांचा निधी हडप केला आहे. यात कोणतीही मोजमाप पुस्तीका व व्हावचर स्वतः कुलकर्णी यांनी तयार केले आहेत. त्यात वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना विचारात घेतले नाही व तशी त्यांची कोणतीही स्वाक्षरी नाही. या कामाची तांत्रीक व प्रशासकीय मंजुरी सुद्धा घेण्यात आलेल नाही. ईमारत पुर्ण झाल्याचा दाखला सुद्धा घेण्यात आलेला नाही. अश्या विविध बाबी पुर्ण न करता सहा. वनसंरक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्वतः ठेकेदार बनत स्वतःच्या पदाचा गैरवापर करुन शासनाच्या लाखो रुपयांचा निधी हडप केला आहे. या संपुर्ण भ्रष्ट कारभाराची विभागी मोठी अफरातफर झाल्याची माहिती अधिकारातून स्पष्ट उघड झाले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here