विजाभज आश्रमशाळेतील कर्मचा-यांचे वेतनवाढीचे प्रस्ताव प्रलंबित नाही – सहाय्यक आयुक्त यावलीकर
‘त्या’ समाजकार्य महाविद्यालयाचा प्रस्ताव त्रृटीपूर्ण आणि विलंबाने

‘त्या’ समाजकार्य महाविद्यालयाचा प्रस्ताव त्रृटीपूर्ण आणि विलंबाने
✍संतोष म मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
चंद्रपूर सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे की : चंद्रपूर येथील समाजकल्याण कार्यालयाला प्राप्त झालेले विजाभज आश्रमशाळेतील कर्मचा-यांच्या वार्षिक वेतनवाढीचे प्रस्ताव निकाली काढण्यात आले असून कोणतेही प्रस्ताव प्रलंबित नाही, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पडोली येथील स्व. सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाचा प्रस्ताव त्रृटीपूर्ण व अडीच महिने विलंबाने प्राप्त झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याबाबत अधिक खुलासा करतांना श्री. यावलीकर म्हणाले, पडोली येथील समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या जुलै 2021 च्या वार्षिक वेतनवाढी समाजसेवा प्रणालीतून प्रमाणित करून देण्याबाबतचा त्रृटीपूर्ण प्रस्ताव 31 ऑगस्ट 2021 रोजी तब्बल अडीच महिने विलंबाने कार्यालयाला प्राप्त झाला. सदर प्रस्तावाची पडताळणी केली असता त्यामध्ये केवळ महाविद्यालयाच्या लेटर हेडवर वार्षिक वेतनवाढीस मान्यता मिळण्याबाबत नमुद केले होते. महाविद्यालयातील कर्मचा-यांनी अर्हताकारी सेवा पूर्ण केली किंवा कसे, याबाबत कुठलाही उल्लेख प्रस्तावात नसल्यामुळे आवश्यक त्या परिपूर्ण दस्ताऐवजांसह तथा शिफारशींसह पुन्हा प्रस्ताव सादर करण्याबाबत समाजकार्य महाविद्यालयाला 9 सप्टेंबर 2021 रोजी कळविण्यात आले होते. समाज कल्याण कार्यालया मान्यता मिढण्या बाबत नमुद केले होते या बाबत कुठलाही उल्लेख प्रसाताव नासल्यामुला आवश्यक त्या परिपूर्ण दस्तावेजय सह तथा शिफार्सीसह पुन्हा प्रसाताव सादर