नागाव कवळेपाडा येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन
नवतरूण नवरात्रौत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: अलिबाग तालुक्यातील नागाव कवळेपाडा येथे नवतरूण नवरात्रौत्सव मंडळाच्या स्त्युत्य उपक्रमाने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
नवतरूण नवरात्रौत्सव मंडळ नागाव कवळे पाडा यांनी नवरात्र उत्सवाचे निमित्ताने साळाव येथील शिवमर्दानी आखाडयाचे नियोजनात सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते रात्री आठ दरम्यान शिवकालीन शस्त्र प्रदर्शन ठेवले होते. या शस्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून इतिहास जिवंत ठेवण्याचे कार्य नागाव कवळे पाडा येथील नवतरूण नवरात्रौत्सव मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र नागलेकर,उपाध्यक्ष दिपक वर्तक, सचिव राजेंद्र नाईक, खजिनदार समिर नाईक व सर्व सभासद यांनी केले.
यावेळी शस्त्र प्रदर्शनाचा शुभारंभ नागाव संचालक मंडळ हायस्कुलचे कार्याध्यक्ष एम.एम. पाटील, तसेच नागाव ग्रा.प. उपसरपंच तथा नवतरूण नवरौत्सव मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र नागलेकर, ग्रा.प.सदस्या प्रिया प्रदिप काठे, ग्रा.प.सदस्या विणा विकास पिंपळे, ग्रा.प.सदस्या रोहिणी कल्पेश म्हात्रे,ग्रा.प. सदस्या निकिता नितिन पाडेकर, लिना जगदीप घरत तसेच परेश ठाकूर यांची उपस्थिती होती. या शस्त्र प्रदर्शनास नागाव ग्रा.प.सरपंच हर्षदा मयेकर यांनी सुध्दा भेट दिली व शस्त्र प्रदर्शन पहाण्याची संधी साधली.
हे शस्त्र प्रदर्शन पहाण्यासाठी नागाव ग्रामस्थ तसेच पि.एन.पी.सायरन पुनावाला हायस्कुल नागाव, नागाव संचालक मंडळ हायस्कुल, राजिप शाळा नागाव मधील विदयार्थीवर्गाने मोठया संख्येने हजेरी लावली व शस्त्र प्रदर्शन पहाण्याचा लाभ घेतला.
नागाव नवतरूण मित्रमंडळ गेली 13 वर्षे नवरात्रौत्सवाचे नियोजन करते, व प्रत्येक वर्षी सामाजीक दृष्टीकोनातून विविध स्तुत्य उपक्रम राबविते. यावर्षी ग्रामस्थ व विदयार्थीवर्गास माहितीसाठी व पहाण्यासाठी शस्त्र प्रदर्शन ठेवण्यात आले असे म्हटले.
या शस्त्र प्रदर्शनास शिवमर्दानी आखाडयाचे व्यवस्थापक किशोर चवरकर, शुभम चवरकर व सहकारी यांनी सर्व उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ व विदयार्थी वर्ग यांना विविध शस्त्राची सखोल माहिती दिली.