अभिजात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा

15

अभिजात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा

अभिजात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर :
स्थानिक सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर, मराठी विभागाद्वारे “आत्महत्या (नाटक) : एक आस्वाद” या विषयावर सदानंद बोरकर सचिव भारतीय शिक्षण संस्था, नवरगाव, यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य, डाॅ. स्वप्नील माधमशेट्टीवार , डॉ. पद्मरेखा धनकर मराठी विभागप्रमुख, डाॅ. पुष्पांजली कांबळे उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात आज नाट्यकलेच्या क्षेत्रात रसिकांचा ओढा राहिलेला नाही. ग्रामीण भागात आजही नाट्यप्रयोग सुरु आहे आणि त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. असे मत प्राचार्य, डाॅ. पी. एम. काटकर यांनी व्यक्त केले. सदानंद बोरकर यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या स्वलिखीत नाटकांची निर्मीती कशा पद्धतीने झाली हा त्यांचा नाट्यलेखनाचा प्रवास उलगडून दाखवला. आपल्या नाटकातून अंधश्रद्धा निर्मूलन, समाजप्रबोधन केलेले आहे. ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना प्रशिक्षित करुन नाट्यक्षेत्राकडे आणण्याचे कार्यही त्यानी केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पद्मरेखा धनकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात ३ ऑक्टोबर २०२४ ला मोठ्या चळवळीनंतर आपल्या मातृभाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला. सर्व निकषांवर मराठी भाषा खरी ठरली आणि केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. प्राचिनत्व या निकषांमागे जी संस्कृती, सामाजिकता, वाङ्मय आणि कला त्या सर्वांचा हा मान आहे. असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी डॉ. पद्मरेखा धनकर यांचा आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी, कोल्हापूरचा “लक्षणीय काव्य पुरस्कार” ‘घेतलंय स्टेअरिंग हाती’ या कवितासंग्रहास व दाक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूरचा “रत्नाकर काव्य पुरस्कार” ‘फक्त सैल झालं दोर’ या कवितासंग्रहास मिळाल्याबद्दल महाविद्यालय व मराठी विभागातर्फे शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन मराठी विभागाचे प्रा. सोहन कोल्हे तर आभार डॉ. धनराज मुरकुटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठी विभागाचे प्रा. अनंता मल्लेलवार, प्रा. श्वेता चंदनकर, प्रा. विवेक पवार, प्रा. वैशाली पंडीत, अमर वेरूळकर, राजु इंगोले यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.