“एका रात्रीत नोट बंदी होऊ शकते तर दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यायला तीन महिने का ? महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपा ला सवाल

38

“एका रात्रीत नोट बंदी होऊ शकते तर दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यायला तीन महिने का ?

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपा ला सवाल

"एका रात्रीत नोट बंदी होऊ शकते तर दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यायला तीन महिने का ?

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपा ला सवाल

कृष्णा गायकवाड
प्रतिनिधी
9833534747

पनवेल: एका रात्रीत इतका मोठा निर्णय (नोट बंदी) लागू होतो, पण शेतकरी कामगार नेते दि.बा. पाटील यांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी तीन महिन्यांची दिरंगाई कशासाठी? जनतेच्या भावना आणि मागणीची ताकद लक्षात घ्यायला इतका वेळ का ? असा सवाल
आज वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथील कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला .यावेळी मोदी हे ‘चौकीदार चोर आहे’, ‘वोट चोर, गद्दी छोड’ आणि ‘फेकू’, म्हणून लक्षात राहतील असंही म्हटलं. गेली ११ वर्षे, माझ्या देशाचा पंतप्रधान मोदी नावाचा लबाड माणूस आहे. नोटबंदी, लॉकडाऊन आणि जीएसटी लागू करण्याचे निर्णय एका झटक्यात घेणाऱ्या मोदींना नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटीलांचं नाव द्यायला एवढा वेळ का लागला? असा सवाल त्यांनी यावेळी केला.मोदी प्रचंड फेकतात, त्यामुळे त्यांच्या उद्याच्या पनवेल येथील कार्यक्रमात सर्वांनी हेल्मेट घालावे, असे मिश्किल आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीका केली.
कामगार नेते स्व. श्याम म्हात्रे यांच्या ७० व्या जयंती निमित्त आयोजित कामगार मेळावा व संविधान जागर तसेच संविधान संवाद यात्रेच आयोजन करण्यात आला होता. याठिकाणी अनेक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा तसेच मीडिया वार्ता चे पत्रकार श्री. दिनेश सुतार यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य आर सी घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव श्रुती म्हात्रे, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल शहर युवक जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, मा. नगरसेवक हरेश केणी, पनवेल अर्बन बँक संचालक जनार्दन पाटील,शाहीर संभाजी भगत, नंदराज मुंगाजी, राज सदावर्ते,तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.