कु. साची बेलोसे झाली पहिली एमसीए स्टेट पॅनल महिला पंच. रायगड जिल्हा क्रिकेट असो.साठी ऐतिहासिक क्षण

47

कु. साची बेलोसे झाली पहिली एमसीए स्टेट पॅनल महिला पंच.

रायगड जिल्हा क्रिकेट असो.साठी ऐतिहासिक क्षण

कु. साची बेलोसे झाली पहिली एमसीए स्टेट पॅनल महिला पंच.

रायगड जिल्हा क्रिकेट असो.साठी ऐतिहासिक क्षण

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-
रायगड जिल्ह्यातील खारघर येथील महिला क्रिकेटपटू कु.साची सुधीर बेलोसे हिने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या स्टेट पॅनल पंच परीक्षा उत्तीर्ण केली असून रायगडच्या क्रिकेट इतिहासातली पहिली महिला पंच होण्याचा मान मिळवला आहे.
कु.साची बेलोसे हिला एमसीए स्टेट पॅनेल पंच परीक्षेत ८२% गुण प्राप्त झाले आहेत. प्रॅक्टिकल परीक्षेत तिला २० पैकी २० गुण मिळाले असून तिने प्रॅक्टिकल परीक्षेत तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.काल एमसीएच्या वतीने स्टेट पॅनल पंच परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.संपूर्ण कोकण विभागातून साची बेलोसे ही एकमेव महिला पंच म्हणून स्टेट पॅनल पंच परीक्षा उत्तीर्ण केली आहे.साची बेलोसे ही एक उत्तम क्रिकेट खेळाडू असून तिने रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या १५,१९,२३ व वरिष्ठ महिलांच्या संघात स्थान मिळवले आहे.साची बेलोसे हिच्याशी संवाद साधला असता तिने पंच परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने महिलांसाठी स्टेट पॅनल पंच परीक्षेचे आयोजन करून महाराष्ट्रातील महिलांना क्रिकेट क्षेत्रात पंच होण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तिने एमसीएचे आभार मानले, तसेच आरडीसीएच्या वतीने जिल्ह्यातील पंचांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून जिल्ह्यातील पंचाना उत्तम दर्जाचे मार्गदर्शन मिळाले असल्याचे तिने सांगितले.रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील क्रिकेट पंचांसाठी १०० दिवसांचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी घेतलेल्या पुढाकाराचे हे फलित असल्याचे तिने सांगितले.
आरडीसीएचे मार्गदर्शक व क्रिकेट नियमांचे तज्ञ नयन कट्टा,बीसीसीआय पंच व माजी रणजी ट्रॉफी खेळाडू हर्षद रावले,एमसीए (मुंबई) पंच राजन कसबे यांनी जिल्ह्यातील पंचाना बहुमूल्य मार्गदर्शन केले आहे.आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील,उपाध्यक्ष यशवंत साबळे,राजेश पाटील,संतोष भोईर, सचिव प्रदीप नाईक,सहसचिव जयंत नाईक,बशीर चिचकर,कोषाध्यक्ष प्रशांत ओक,आरडीसीएचे कार्यकारणी समिती सदस्य ॲड.पंकज पंडित,समीर मसुरकर,प्रदीप खलाटे,कौस्तुभ जोशी, मुख्य प्रशिक्षक शंकर दळवी यांनी साची बेलोसे हिचे अभिनंदन केले आहे.आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की गेल्या एक वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील १२ पंचांनी एमसीए पंच पॅनेलसाठी पात्रता मिळवली असून ११ अधिकृत एमसीए स्टेट पॅनेल स्कोअरर्स कार्यरत आहेत.ही रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची मोठी कामगिरी म्हणावी लागेल. रायगड जिल्ह्यात क्रिकेट खेळाचा दर्जा वाढवण्यासाठी चांगल्या दर्जाचे पंच व स्कोअरर्स तयार करणे गरजेचे आहे त्यासाठी आरडीसीए सातत्याने परिश्रम घेत आहे. जिल्ह्यातील विविध वयोगटातील मुला- मुलींची निवड महाराष्ट्राच्या संघात होत असून पुरुषांना बरोबर महिला पंच व स्कोअरर्स देखील एमसीए मध्ये कार्यरत होत असल्याचा आपल्या आनंद असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी सांगितले.
साची बेलोसे हिने एमसीए स्टेट पॅनल पंच परीक्षा उत्तीर्ण केलेल्या नंतर तिचे संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.