राजमुद्रा हॉटेलचे भव्य उद्घाटन नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते संपन्न
खवय्यांसाठी चविष्ट भोजनाची नवी परवणी
सिद्धेश पवार,
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532
पोलादपूर
पोलादपूर तालुक्यातील उद्योजक श्री. सुनील मोरे यांनी आपल्या कठोर परिश्रमांनी उद्योग क्षेत्रात यश संपादन केल्यानंतर, हॉटेल व्यवसायात नव्याने पदार्पण करत पोलादपूर तालुक्यात ‘हॉटेल राजमुद्रा’ या नावाने एक चविष्ट आणि सुसज्ज हॉटेल सुरु केले आहे. या हॉटेलचे भव्य उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री आ. भरत शेठ गोगावले यांच्या शुभहस्ते तसेच श्री. सुनील मोरे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई मोरे यांच्या आशीर्वादाने चरई फाटा, पोलादपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
हॉटेल राजमुद्रा हे केवळ भोजनालय नसून, खवय्यांसाठी एक खास ठिकाण बनले आहे जिथे दर्जेदार, चविष्ट व पारंपरिक मराठी जेवणाची चव अनुभवता येणार आहे. स्थानिक तसेच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी हे हॉटेल उत्तम सोयीसह सज्ज करण्यात आले आहे.
उद्घाटन समारंभास अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यामध्ये युवा सेना कोअर कमिटी सदस्य श्री. विकस गोगावले, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री. लक्ष्मण मोरे, नगराध्यक्ष सौ. शिल्पा देवेंद्र दरेकर, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले, बांधकाम सभापती सिद्धेश्वर, नगरसेवक विनायक दीक्षित, माजी नगराध्यक्ष व नगरसेविका सौ. सोनल गायकवाड, अश्विनी पवार, सुनिता पार्टे, शहर प्रमुख सुरेश पवार, रायगड वैभव साप्ताहिक संस्थापक श्री अनिल मोरे, नक्षत्र फार्मिंग मालक मेढेकर, सतीश शिंदे तसेच मोरे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नामदार भरत गोगावले यांनी शुभेच्छा रुपी भाषणात असेच अनेक उद्योजक निर्माण होतील उद्योजक नवी प्रगती होईल अशा शुभेच्छा दिल्या
युवासेना कोर कमिटी सदस्य श्री विकास शेठ गोगावले यांनी शुभेच्छा देता सांगितले कि हॉटेल राजमुद्रा हे केवळ एक व्यवसाय नसून, स्थानिकांना रोजगाराची संधी व चवदार भोजनाची हमी देणारे एक महत्वाचे केंद्र बनणार आहे पुढील काही दिवसांत ते पंचतारांकित हॉटेल होईल व एकाचे दोन तीन शाखा होईल अशा . सुनील मोरे यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या