सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या सतर्कतेमुळे चोरीला गेलेले मोबाईल मूळ मालकांना परत
म्हसळा: संतोष उद्धरकर.
म्हसळा: तिन ते चार महिन्या पूर्वी म्हसळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे १,२०, ००० ( एक लाख विस हजार रु ) किंमतीचे ६ मोबाईल हरविल्याची तक्रार म्हसळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती, या व्दारे म्हसळा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास यंत्रणाच्या अनुशंगाने सी ई आय आर पोर्टल व्दारे ट्रेसिंग करून मोबाईल ट्रेस करण्यात आले यामुळे १, २०, ००० किंमतीचे ६ मोबाईल सापडून चोरट्यांकडुन हस्तगत करण्यात म्हसळा पोलिसांना यश आले असून उप विभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी यांच्या हस्ते मोबाईलचे मूळ मालक
१ ) संतोष पानसरे
२ ) योगेश भागवत
३) सुदेश देवडे
४ ) जमीर तुरुक
५ ) अजिज नजीर
६ ) स्वप्नील लाड
या सर्वांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. म्हसळा पोलीसांनी दाखविलेला विश्वास,व सतर्कता तसेच संदीप कहाळे यांची तपास यंत्रणा व योग्य दिशा या मुळे चोरीचे मोबाईल सापडले असल्याने वरील तक्रारदारांनी संदीप कहाळे यांचे कौतुक करून आभार व्यक्त करण्यात आले.