सन्मान केलेल्या कार्याचा ! सन्मान पत्रकारितेचा !! मीडिया वार्ता न्यूज चे पत्रकार श्री. दिनेश सुतार यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते पुरस्कार

57

सन्मान केलेल्या कार्याचा ! सन्मान पत्रकारितेचा !!

मीडिया वार्ता न्यूज चे पत्रकार श्री. दिनेश सुतार यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते पुरस्कार

सन्मान केलेल्या कार्याचा ! सन्मान पत्रकारितेचा !!

मीडिया वार्ता न्यूज चे पत्रकार श्री. दिनेश सुतार यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते पुरस्कार

कृष्णा गायकवाड
प्रतिनिधी
9833534747

पनवेल: माथेरान मधील हरहुन्नरी पत्रकार,आपदामधून आपत्कालीन परिस्थिती लोकांना आधार देणारे,माजी नगरसेवक श्री. दिनेश सुतार यांना पत्रकारिता तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल एकता कॅटेलिस्ट या संस्थेकडून सन्मानित करण्यात आलं. कामगार नेते स्व.श्री श्याम म्हात्रे यांच्या ७० व्या जयंती निमित्त पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह आयोजित कामगार मेळावा , संविधान जागर कार्यक्रमाचं औचित्य साधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते शाल आणि सन्मान चिन्ह देऊन उल्लेखनीय कामगिरी बद्दल गौरविण्यात आले.
याप्रसंगी पत्रकारांनी बेधडक भूमिका घेऊन संविधानाच्या चौथ्या स्तंभाचं काम चोख पाडाव असही प्रतिपादन सपकाळ यांनी यावेळी सांगितलं.