गोंदियात कापड दुकानाला आग; लाखोंचे नुकसान.

64

गोंदियात कापड दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ  गजबजली आहे. लग्नसोहळेदेखील पार पडणार आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी गोंदियातील बाजारात गर्दी करीत आहेत

 

गोंदिया :-  येथील गजबजलेल्या खोजा मशीद परिसरातील एनडी टेक्सटाईल्स या कापड दुकानाला आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना शनिवारी  घडली.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ  गजबजली आहे. लग्नसोहळेदेखील पार पडणार आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी गोंदियातील बाजारात गर्दी करीत आहेत. दररोज ही गर्दी असते. त्यातही कपड्यांच्या दुकानांत सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे.

दरम्यान, आज शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास  गोरेलाल चौक ते स्टेडिअमदरम्यान असलेल्या खोजा मशीदजवळ असलेल्या एनडी टेक्सटाईल्स या कपड्यांच्या दुकानाला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले.

नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, आग लागण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत.