पाचोरा येथे राष्ट्रीय ओबीसी मोर्चा तर्फे प्रबोधन कार्यक्रम संपन्न

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 7666739067
*राष्ट्रीय ओबीसी मोर्चा पाचोरा शहर युनिटच्या वतीने दिनांक 7 नोव्हेंबर रोजी अहिर सुवर्णकार मंगल कार्यालय देशमुख वाडी पाचोरा येथे ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, तीन कृषी कायदे रद्द करा, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या या विषयांवर ओबीसी परिषद संपन्न झाली याप्रसंगी स्वातंत्र्यसैनिक नागो बारकू सोनार विचारमंचावर माननीय दिलीप भाऊ वाघ (माजी आमदार पाचोरा भडगाव मतदार संघ), माननीय विष्णू (बापू) सोनार (माजी नगराध्यक्ष), माननीय डॉक्टर भूषणदादा मगर (संचालक विघ्नहर्ता हॉस्पिटल पाचोरा), मा. नगरसेवक वासुदेव जी माळी बांधकाम सभापती नगरपालिका पाचोरा, माननीय खलील दादा देशमुख (जिल्हा प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), माननीय शरद भाऊ पाटे (माजी उपनगराध्यक्ष), माननीय प्रवीणदादा साहेबराव पाटील (जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड), हाजी नशिरशेठ बागवान (माजी नगराध्यक्ष), माननीय सुमित किशोरआप्पा पाटील (युवा नेते शिवसेना), माननीय हमीद भाऊ शहा (तालुका अध्यक्ष राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा), माननीय मच्छिंद्र भाऊ जाधव (सामाजिक कार्यकर्ते) तसेच माननीय सुनीलदादा शिंदे (जिल्हाअध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी मोर्चा) उपस्थित होते.*
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुबारक शहा सर (राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक) यांनी सांगितले की, ओबीसींच्या 3743 जाती असून त्यांची 1951 पासून जनगणना बंद आहे त्यामुळे 1931 च्या जनगणनेनुसार 52 टक्के असलेल्या ओबीसी समाजाला फक्त 27 टक्के प्रतिनिधित्व – आरक्षण मिळालेला आहे. वास्तविक आता ओबीसींची संख्या वाढलेली असून देखील मागील व विद्यमान केंद्र सरकार जनगणना करायला तयार नाही म्हणून राष्ट्रीय ओबीसी मोर्चाने राष्ट्रव्यापी आंदोलन छेडले आहे, पाच टप्प्यापैकी तिसऱ्या टप्प्यात 12 नोव्हेंबर रोजी भारतातील पाच हजार तालुक्यात तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे व राष्ट्रपतींना निवेदन पाठवले जाणार आहे तरी सर्वांनी या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले*
*मा महाजन सर (उपाध्यक्ष माळी समाज मंडळ) यांनी ओबीसींना जागृत होऊन एकत्र येण्याचे आवाहन केले, तालुकास्तरीय धरणे आंदोलनात माळी समाज सक्रिय सहभागी होईल असे प्रतिपादन केले*
*माजी आमदार मा दिलीप भाऊ वाघ यांनी सांगितले की, आमचे नेते माननीय छगन भुजबळ साहेब हे या विषयावर राज्यभर भर जनजागृती करत आहेत व ओबीसींच्या हक्काचा लढा देत आहेत या आंदोलनात माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सर्व कार्यकर्ते सक्रिय पुणे सहभागी होतील.*
*नंदकुमार सोनार (माजी नगरसेवक) यांनी सांगितले की, आपण ओबीसी एकत्र येत नाहीत तसेच आपल्या हक्कांसाठी आपण जागृत नाहीत आतातरी ओबीसी समाजाने जागृत झाले पाहिजे व धार्मिक – जातीय द्वेष पसरवणाऱ्या गोष्टींमध्ये आपला वेळ घालवण्यापेक्षा, धार्मिक कर्मकांड मध्ये वेळ न दवडता राष्ट्रीय ओबीसी मोर्चा च्या माध्यमातून आंदोलनात सक्रीय सहभागी व्हावे. दहा वर्षांपूर्वी 2010 च्या जनगणने मध्ये देखील ओबीसींची जातवार जनगणना व्हावी यासाठी आम्ही याच कार्यालयात ओबीसींची मिटिंग घेतली होती त्यावेळी फक्त दहा कार्यकर्ते हजर होते पण आज दहाचे 100 शंभर कार्यकर्ते झालेले पाहून समाधान वाटत आहे व शंभर चे हजार कसे होतील यासाठी आपण प्रयत्न करूया व 12 नोव्हेंबर चे धरणे आंदोलन यशस्वी करूया असे त्यांनी आवाहन केले.*
*डॉ भूषणदादा मगर यांनी ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे तसेच शेतकरी विरोधातील तीन कृषी कायदे शेतमालाला हमीभावाचा समावेश नसलेला कायदा, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा, अमर्याद साठेबाजीचा कायदा रद्द व्हावेत यावर जोर दिला व सक्रिय सहभाग पाठिंब्याचा आश्वासन दिले.*
*विष्णू (बापू) सोनार (माजी नगराध्यक्ष) यांनी सांगितले की, दहा वर्षांपूर्वी झालेल्या जनगणनेच्या वेळी ओबीसींची जातिनिहाय जनगणना होत नसल्याने आम्ही आमची माहिती द्यायला नकार दिला होता परंतु प्रशासनाने तेव्हाही आमची जातवार गणना केली नाही. 75 वर्षांपासून ओबीसी त्याच्या अधिकारांपासून वंचित आहे, आतातरी सरकारने जनगणना करून ओबीसींना न्याय द्यावा. तसेच जो पक्ष संघटना ओबीसींची जातीनिहाय जनगणनेच्या संदर्भात पाठिंबा देईल त्यालाच आम्ही सहकार्य करू. 12 नोव्हेंबरला सर्वांनी धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.*
*माननीय अझहर खान (शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांनी सांगितले की, विद्यमान भाजपाचे केंद्र सरकार ओबीसींवर अन्याय करत आहे तसेच ओबीसींच्या लोकसंख्येचा इम्पीरियल डेटा देत नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे तरी सर्वांनी 12 नोव्हेंबर च्या धरणे आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे.*
*खलील दादा देशमुख (जिल्हा प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांनी तीस वर्षांपूर्वी च्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की मंडल आयोगाच्या समर्थनात जनजागृती व्हावी यासाठी आम्ही तत्कालीन ओबीसीच्या मंडल आयोगासाठी लढा देणाऱ्या रामविलास पासवान यांची सभा घेतली होती तसेच दोन दिवस ओबीसी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर देखील आयोजित केलं होतं. आता पुन्हा आम्ही राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या आंदोलनात सक्रियपणे उतरणार आहोत तसेच ओबीसी जनगणने संदर्भात 3 कृषीकायद्याच्या विरोधात सांस्कृतिक पथकांच्या साहाय्याने जनजागृती करण्याची सूचना देखील केली*
*माननीय दीपक आदीवाल (राज्य उपाध्यक्ष एमबीसी मोर्चा) यांनी सांगितले की, तत्कालीन पंडित नेहरू सरकारने आश्वासन देऊन देखील ओबीसींची जनगणना केली नाही ओबीसींसाठी चा आयोग नेमला नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला व ओबीसी नेत्यांना संघटित करून आंदोलन पुकारले परंतु काँग्रेस सरकारने दगडफेक करून ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, मी ओबीसी नसून देखील ओबीसींना हक्क अधिकार मिळावेत यासाठी सक्रियपणे मैदानात उतरलोय आपण देखील पुढे या व आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.*
*कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुनील दादा शिंदे (जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी मोर्चा) यांनी सांगितले की, संविधान सभेमध्ये पंडित नेहरूंनी आश्वासन दिले होते की, ओबीसींना संविधानिक हक्क अधिकार व संरक्षण दिले जाईल परंतु त्यांनी ते आश्वासन पाळले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये कलम 340 लिहून केंद्र सरकार सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या ओबीसींची ओळख पटवून त्यांना संख्येच्या प्रमाणात आरक्षण हक्क अधिकार देईल अशी तरतूद केली आहे परंतु पंडित नेहरूंनी 340 कलमाप्रमाणे ओबीसींसाठी आयोग नेमला नाही म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला तेव्हा काका कालेलकर आयोग नेमण्यात आला त्या आयोगाने ओबीसींचा डाटा जमा करून 2500 जाती शोधून काढल्या परंतु काका कालेलकर यांनी ओबीसींना आरक्षण देऊ नये असे पत्र जोडले व त्यात म्हटले की, “सर्विसेस आर नॉट फॉर सर्वेन्ट्स” याचा अर्थ आम्ही कोणाचेतरी नोकर आहोत, पण मग आमचा मालक कोण आहे? तर साडेतीन टक्के लोक आम्हाला नोकर समजतात व स्वतःला मालक समजतात याची खरं तर चीड यायला पाहिजे, मागील डॉ मनमोहन सिंग यांच्या काळात माननीय हरी नरके प्लॅनिंग कमिशनचे सदस्य होते आणि मॉन्टेकसिंग अहलुवालिया प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष होते तेव्हा माननीय हरी नरके यांच्या लक्षात आलं की ओबीसींना विकासासाठी फक्त 358 कोटी रुपये दिलेले आहेत म्हणजेच एका ओबीसीला 37 पैसे.. हरी नरके यांनी विचारल्यावर मॉंटेकसिंग अहलुवालिया म्हणाले की, “देअर इज नो डिमांड” तसेच ओबीसींची संख्या किती हे माहीत नसल्याने फक्त एवढीच तरतूद केली. या मुद्यावरून भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम यांनी संसदेच्या बाहेर 200 खासदारांची मीटिंग घेतली त्याचा परिणाम असा झाला की, समीर भुजबळ व गोपीनाथ मुंडे दोन्ही विरोधी पक्षातले खासदार एकाच बाकावर बसून ओबीसींची जनगणना करा ही मागणी करू लागले, तसेच माननीय शरद यादव यांनी राज्यसभेत सांगितले की “इस देश मे हिजडो की गिनती होती है, लेकिन पिछडोकी गिनती नही होती है”. या देशात जनावरांची गणना होते परंतु ओबीसींची गणना होत नाही हे अत्यंत खेदजनक आहे. यावर्षी देखील केंद्र सरकारने 28 लाख कोटी रुपये बजेट मधून अनुसूचित जाती व ओ बी सी यांच्या विकासासाठी फक्त 85 हजार कोटी रुपये तरतूद केली आहे म्हणजेच एका ओबीसीसाठी फक्त तीन रुपये. तीन रुपयात चहादेखील मिळत नाही तर ओबीसींचा विकास कसा होऊ शकेल? म्हणूनच राष्ट्रीय ओबीसी मोर्चा ने राष्ट्रव्यापी आंदोलन छेडले आहे. तिसरा टप्पा अंतर्गत 12 नोव्हेंबर रोजी देशातील पाच हजार तालुक्यात धरणे आंदोलन होईल पाचोरा येथेदेखील तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे तरी सर्वांनी या आंदोलनात सक्रियपणे सहभागी व्हावे. आपल्या पक्ष संघटनेचा झेंडा, बॅनर, अजेंडा घेऊन आला तरी चालेल परंतु आता जर ओबीसींची जनगणना झाली नाही तर पुन्हा दहा वर्ष हक्कापासून वंचित राहावे लागेल म्हणून सारे काही मतभेद बाजूला सारून सर्वांनी तन मन धनाने सहभागी व्हावे असे प्रतिपादन केले.*
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर आर सोनवणे यांनी केले तर आभार विलास भास्कर पाटील (राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी मोर्चा) यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विष्णू (बापू) सोनार यांनी अहिर सुवर्णकार मंगल कार्यालयाचा हॉल मोफत उपलब्ध करून दिला तसेच सचिन पैठणकर, ज्ञानेश्वर पाटील, रत्नाकर सोनवणे, सुनील भिवसने, हमीद शहा, मुबारक शहा, मच्छिंद्र जाधव, अशोक भाऊ मोरे(नगरसेवक), किशोर भाऊ डोंगरे, एडवोकेट रोहित ब्राह्मणे, नंदकुमार सोनार, हरिभाऊ पाटील, हाजी नसिरशेठ बागवान, संजय शिवाजी महाले, रमेश जाधव, बापू चिंचोले सर, रवींद्र कुमावत, जाकिर खाटीक, धोंडू भिवसन हटकर, शफी मिस्तरी, हमीद कुरेशी, हारुन बागवान, अनिल मिस्त्री, बापूराव सुतार यांनी सहकार्य केले.