औरंगाबाद येथे शाळा बंद निर्णयाच्या निषेधार्थ भारतीय लोकसत्ताक संघटना व भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाच्यावतीने आंदोलन

47

औरंगाबाद येथे शाळा बंद निर्णयाच्या निषेधार्थ भारतीय लोकसत्ताक संघटना व भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाच्यावतीने आंदोलन

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी

Chhatrapati Shivaji Maharaj Award 2025

मो. नं. ९८६९८६०५३०

औरंगाबाद – महाराष्ट्र शासन हजारो शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे.त्यामुळे खेड्यातील, आदिवासी पाड्यातील, झोपडपट्टीतील सर्वसामान्य लाखो विद्यार्थी विद्यार्थीनी शिकू शकणार नाहीत.या निर्णयाच्या निषेधार्थ निषेध_चौक_सभा, सोमवार, दिनांक – ०७/११/२०२२, सायंकाळी ४.०० वा. ठिकाण – आपेगाव, तालुका- पैठण, जिल्हा- संभाजीनगर (औरंगाबाद) येथे भारतीय लोकसत्ताक संघटना आणि भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाच्यावतीने निषेध चौक सभा घेण्यात आली

तसेच कमी पट संख्या असणाऱ्या शाळा बंद करण्यात येणार नाहीत या बाबत शिक्षण मंत्री यांनी परिपत्रक काढावे असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

 

‘जय भारत, जय संविधान’

‘शिक्षण आमचा अधिकार,बंद करा त्याचा व्यापार’

‘समान दर्जाचे शिक्षण देशात शिकवले गेले पाहिजे’

‘शासकिय_शाळा_सुरू_राहिल्याच पाहिजेत’

अश्या घोषणा देऊन संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आले.

या निषेध चौक सभेला सहभागी झालेल्या पदाधिकारी कार्यकर्ते नितीन सातपुते,सचिन कोल्हे,शुभम कोल्हे,नितीन खंडागळे, चैतन्य कोल्हे, विष्णू कोल्हे,अशोक कोल्हे,लक्ष्मण भोंगळे, केशव कोल्हे,विष्णू कोल्हे,अंकुश भोंगळे, आत्माराम कोल्हे,प्रल्हाद सातपुते, रावसाहेब कोल्हे,अरूण सातपुते, सतीश सातपुते, अतिश सातपुते, विकास रोटे आदी सर्व गावकरी मंडळीनी उपस्थिती दर्शवली होती.