उमरखेड येथे धारदार शस्त्राने वार करून एका युवकाचा खून

56
उमरखेड येथे धारदार सुरीने खुपसून एका युवकाचा खून

उमरखेड येथे धारदार सुरीने खुपसून एका युवकाचा खून

उमरखेड येथे धारदार सुरीने खुपसून एका युवकाचा खून

✒️बबलू भालेराव ✒️तालूका प्रतिनिधी ऊमरखेड ) मो.9637107518

उमरखेड (दि. 8 नोव्हेंबर) राहुल अनिल शिंदे वय 21 वर्ष व्यवसाय मजुरी जात- घिसडी, रा. महात्माफुले वार्ड उमरखेड ता. उमरखेड जिल्हा यवतमाळ.

मी समक्ष पोलीस स्टेशनला हजर येवुन जबानी रिपोर्ट दिला आहे.

सविस्तर वृत्त असे की, आमचे गल्लीतच घर शेजारी राहणारे भाउराव गायकवाड हे राहत असुन त्यांच्या सोबत त्यांचे परिवारात त्यांचे मुले धर्मा भाउराव गायकवाड, धिरज भाऊराव गायकवाड, करण भाउराव गायकवाड असे एकत्र राहतात.

काल दिनांक 07/11/2023 रोजी आमचे घरी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा कंदोरीचा कार्यक्रम होता.

सांयकाळी 06/00 वाजे नंतर कंदोरीच्या जेवनाचा कार्यक्रम सुरु झाला. रात्री अंदाजे 10/00 वा चे दरम्याण जेवणाची शेवटची पंगत चालु असतांना मुले एकामेकांना बोलून हसी मजाक करीत होते.

त्यावेळी धर्मा गायकवाड तेथे आला तो म्हणाला की तुम्ही हसी मजाक व बोलण्याचा आवाज कमी करा..! माझ्या घरचे मुले झोपत नाहीत. असे म्हणुन तो त्याच्या घरा समोर गेला.
तेंव्हा तेथे करणचा वडील भाऊराव गायकवाड, धिरज गायकवाड, धर्मा गायकवाड तसेच त्यांच्या दोन्ही मुली व करणची आई असे उभे होते.

त्यावेळी माझा चुलत भाऊ नामे गोविंद सुभाष शिंदे वय 27 वर्ष हा करण गायकवाड याला काय झाले माझ्या घरी कार्यक्रम असतांना विनाकरण का भांडणे करतो असे म्हणताच करण गायकवाड व धर्मा गायकवाड यांनी चुलत भाऊ गोविंद शिंदे यास धक्का देवुन मागे ढकलले तेवढ्यात करण गायकवाड हा त्याचे घरात जावुन खंजीर सारखे शस्त्र आणले तेवढ्यात माझी आई व गोविंद शिंदेची आई यांनी मध्यस्ती करुन घराकडे ओढत होती.

त्यावेळी भाउने आईला हाताचा झटका देवुन करणकडे गेला त्यावेळी वरील करण गायकवाड, धर्मा गायकवाड, धिरज गायकवाड यांनी भाऊ गोविंदला मारत मारत संतोष गावंडेच्या घरासमोर नेवुन धारधार शस्त्राने सपासप वार केल्याने माझा भाऊ गोविंद खाली पडला व त्याचा तेथेच मृत्यु झाला.

मारहाण करतांना करन गायकवाडच्या हातात खंजर होते.
धर्मा गायकवाडच्या हातात लोखंडी रॉड होता, धिरज गायकवाडच्या हातात पण लोखंडी रॉड होता. त्यांनतर मी आरडा ओरड केल्याने गोविंदचा भाऊ दिपक शिंदे, व गल्लीतील मुलांनी मोटार सायकलवर बसवुन सरकारी दवाखान्यात नेले.

तरी माझा चुलत भाऊ गोविंद सुभाष शिंदे व करण भाउराव गायकवाड वय अंदाजे 23 वर्ष, धर्मा भाउराव गायकवाड वय अंदाजे 25 वर्ष, धिरज भाउराव गायकवाड वय अंदाजे 21 वर्ष सर्व जात मांतग रा. महात्माफुलेवार्ड उमरखेड यांनी आमचे घरातील कंदोरीचे कार्यक्रमात हसी मजाक व मुले आवाज करीत असल्याचे कारणावरुन धारधार शस्त्रानी वार करुन भाऊ गोविंद यांचा खुन केला म्हणुन माझी त्यांचे विरुध्द कायदेशीर तक्रार आहे.