ग्रामीण भागातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणी !
केज दि ७(प्रतिनिधी): तालुक्यातील कृषिधन,शिंजीर मिल्क ॲण्ड ॲग्रो प्रोडयुसर कंपनी केज यांच्या वतीने दि.७ ते ९ हे तीन दिवशीय कृषी प्रदर्शन विठाई मंगलकार्यालय येथे सुरू झाले. कृषी प्रदर्शनाची सुरुवात शालेय विद्यार्थी यांच्या शोभायात्रा काढून झाली.कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन खा. बजरंग सोनवणे, हवामान तज्ञ पंजाबराव डक, तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे, पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे,विकास मिरगणे,हनुमंत भोसले,यांच्या हस्ते व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य कृषी प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन झाले. केज येथे भव्य ग्रामीण कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
उद्धघाटक खा .बजरंग सोनवणे म्हणाले ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही एक पर्वणी आहे शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवता येईल. शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनास भेट देऊन तंत्रज्ञान अवगत करावे
कृषी प्रदर्शन आयोजक कंपनीचे अभिनंदन करून केले. हवामान अभ्यासक पंजाबराव डक म्हणाले, शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार आपलं पीक व्यवस्थापन करावे. तंत्रज्ञाना शिवाय शेतीला पर्याय उरलेला नाही. कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्यासाठी अभ्यासपूर्ण शेती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित त्यांनी प्रदर्शनाची पाहणी करून शुभेच्छा दिल्या
आज आणि उद्या दोन दिवस हे कृषी प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहेजिल्हयातील सर्व शेतकरी बांधव, महिला बचत गट, शेतकरी गट, व्यवसायीक यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कंपनीचे संचालक विशाल चौरे यांनी केले.
या प्रदर्शनात महाराष्ट्रातील शेतीशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान , पाणी व्यवस्थापन , पिक व्यवस्थापन या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. केज तालुक्यात पहिल्यांदाच कृषी प्रदर्शनाचे आयेाजन करण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांनी,शेतकरी गटांनी कृषी प्रदर्शनास भेटी दिल्या. शिंजीर मिल्क ॲण्ड ॲग्रो प्रोडयुसर कंपनीने पुढाकार घेत या कृषी प्रदर्शनाचे आयेाजन केले आहे. यामुळे केज तालुक्यातील तसेच बीड जिल्हयातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी येत आहेत प्रदर्शनामध्ये प्रगत शेती
मशिनरी , आधुनिक साधने ,सुधारीत बीयाणे, खते ,किटक नाशके ,दुग्धव्यवसाय या विषयी थेट प्रात्यक्षीके आहेत. हे प्रदर्शन शेतकरी, व्यापारी, विक्रेते, वैज्ञानिक, विदयार्थी यांच्यासाठी एक व्यासपीठ म्हणुन उपलब्ध आहे. यामुळे आपल्या जिल्हयातील तसेच मराठवाडयातील शेतीतील व शेतीपुरक व्यवसायातील उत्पादनासाठी निश्चीतच मदत होईल. असे मत उपस्थितांनी व्यक्त केले
हे कृषी प्रदर्शन मराठवाडयातील पारंपारीक शेतीचे देखावे हे या कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले आहे. पहिल्या कृषी प्रदर्शनात शेतकरी, महिला बचत गट, व्यावसायिक विद्यार्थी यांनी भेटी दिल्या.









