संविधानाचा अपमान करणारे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे यांच्या निलंबनाची मागणी

36

संविधानाचा अपमान करणारे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे यांच्या निलंबनाची मागणी

विविध गैरवर्तणाच्या तक्रारी दाखल असल्याने भविष्यात जबाबदारीचे पद देवू नये.

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी
8806689909

सिंदेवाही :- संविधानातील तरतुदींचे उल्लंघन करणे, पक्षःपाती व भेदभावने कार्ये करणे, ज्यात लाच घेतली जाऊ शकते असा संशय निर्माण झाला आहे. निरपवाद सचोटीने न वागणे, कालमर्यादा तत्वाचे उल्लंघन करणे, त्यांचे हाताखालील असलेले कर्मचारी यांनी केलेल्या गैरवर्तन व गैरशिस्त प्रकरणातल्या तक्रारी प्रलंबित व दडवून ठेवणे, विहीत मुदतीत कार्यवाही न करणे, सर्वश्रेष्ठ भारतीय संविधानाशी निष्ठा बाळगून कारभार करण्याची शपथ घेतली पण एकनिष्ठेने कामकाज केल्याचे सकृतदर्शनी दिसत नाही. याचा अर्थ किशोर गुलाब पिसे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी संविधानाशी निष्ठा राखून कार्य करण्याची जी शपथ घेतली होती त्या शपथेचा भंग केलेला आहे हे नाकारता येणार नाही.
कायदा सर्वासाठी समान आहे हे उदिष्टये सर्वश्रेष्ठ भारतीय संविधानाने दिलेले आहे..किशोर गुलाब पिसे यांनी जसे ईतर तक्रारीमध्ये वेळेीच चौकशी करण्याचे दायीत्व स्विकारले त्याच समान धर्तीवर आम्ही दाखल केलेल्या तक्रारीवर वेळीच चौकशी करण्याचे दायीत्व व जबाबदारी स्विकारली नाही.यावरुन स्पष्ट होते की, .किशोर गुलाब पिसे हे एकाला एक न्याय व दुसऱ्याला वेगळा न्याय देवून भेदभाव व प:क्षपात केला आहे असे कागदोपत्री दिसते.तथापि, श्री.किशोर गुलाब पिसे यांनी भारतीय संविधाना्रपती एकनिष्ठ राहून कोणताही प३क्षपात व भेदभाव करणार नाही अशी शपथ घेतलेली आहे. असे असूनही श्री.किशोर गुलाब पिसे यांनी आम्ही दाखल केलेल्या तक्रारीमध्ये चौकशी करण्यास भेदभाव व प:क्षपात केला आहे म्हणजे शपथपत्राचा भंग केला आहे यासाठी श्री.किशोर गुलाब पिसे हे जबाबदार आहेत.
किशोर पिसे यांची नियमबाह्य वर्तणूक
गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिंदेवाही यांनी दिनांक २०/१०/२०२३ रोजी शासनाचे व जि.प.चे कोणतेही आदेश नसताना सक्षम प्राधिकारी यांची पूर्व मंजुरी न घेता संबंधिताची प्राथमिक शाळा सिंदेवाही क्रमांक २ येथे प्रतिनियुक्ती केली. त्यावेळी त्याच दिवशी गटशिक्षणाधिकारी यांचे समक्ष शालेय आवश्यक दस्तावेज प्रभारी मु.अ.कडे सुपर्द करण्यात आले होते व उर्वरित आर्थिक व्यवहाराचे दस्ताऐवज नंतर देण्यात येईल असे पत्रात नमूद असताना,संबंधित शिक्षिका ह्या शाळेत अरेरावीने वागत असल्यामुळे नको ते आरोप करण्याची शक्यता असल्यामुळे पर्यवेक्षिय अधिकारी यांचे समक्ष आर्थिक व्यवहाराच्या दस्ताऐवजचा प्रभार देण्याबाबत कळविले होते परंतु तत्कालीन गटशिक्षणाधिकारी यांनी पर्यवेक्षिय अधिकारी यंत्रणेतील कोणतेही अधिकारी न दिल्यामुळे प्रभार देऊ शकलो नाही असे पत्रव्यवहार यातून दिसून येत आहे.
दि. 12.10. 2023 ला तत्कालीन गटशिक्षणाधिकारी पं. स. सिंदेवाही यांनी दोन्ही शिक्षकांच्या बदल्या केल्या. त्यानुसार मुख्याध्यापक यांनी दि० 13/10/2023 ला शिक्षिकेला शाळेतून भारमुक्त करून, वरिष्ठांना कळविले होते. परंतू त्या रोज शाळेत येवून तणाव व भितीचे वातावरण तयार करित होत्या तत्कालीन गटशिक्षणाधिकारी यांना तकार देवूनही दखल घेतल्या आत नव्हती.त्यामुळे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी कुणाच्या दावणीला बांधले होते. हा प्रश्नच? याजही अनुत्तरित आहे.
जिल्हा परिषद चंद्रपूर पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरगाव येथे स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शासकिय परिपत्रकानुसार आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण प्रसंगी शाळेतील शिक्षिका संगीता मधुकर कुंभारे अनुपस्थित असल्याने मुख्याध्यापक सागर तारानाथ शंभरकर यांनी केलेल्या सुचनेचे पालन न करता वरिष्ठांच्या सुचनेचा अपमान करुन,शिवीगाळ केल्याचा आरोप स्वातंत्र्यदिनी पालक सभेत करून ,बेशिस्तपणे वागून गोंधळ निर्माण करून शांतता भंग करत बदनामी व अपमान केल्याची अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या गंभीर तक्रारीची दखल न घेता हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून प्रकरण वाढविण्यासाठी खतपाणी घालून, जातीय द्वेषातून राईचा पर्वत करून किशोर पिसे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षिकेला पाठबळ देवून,मानसिकता खराब करून प्रतिष्ठा मलिन केली आहे. राजकीय दबावामुळे शिक्षिकेची बदली रद्द करुन, संरक्षण दिले होते.
किशोर पिसे यांची भूतकाळातील गैरवर्तणूक
वन्यजीव (संरक्षण) अनिधिम 1972 चे कलम 2 (16) 9, 39 व 51, नुसार वन गुन्हा क्रमांक 9151/228753दि०15/12/2021 अन्वये लावा पक्षी खरेदी करणे व शिकार करणे, गुन्हा दाखल (संदर्भ- वनपरिक्षेय अधिकारी (प्रादेशिक) चिमूर पत्र क्र./वपअ/चिमूर/1470/ चिमूर दि० 16/12/2021) वृत्तपम बातमी प्रसिद्ध झाली.
बोगस अपंग प्रमाणपत्राच्या आधारे सरळ सेवेच्या माध्यमातून विस्तार अधिकारी शिक्षण पदस्थापना घेणे.विनातारखेचे अपंग प्रमाणपत्र No. of GHC/338/0fice of the civil surgeon General Hospital chend Dt…….(निरंक)- सदर बोगस प्रमाणपत्राच्या आधारे सरळ सेवेच्या माध्यमातून विस्तार अधिकारी शिक्षण पदस्थापना घेऊन ,मुळ दिव्यांग कर्मचारी यांच्यावर अन्याय झाला आहे.पदोन्नती आदेश क्र .शिक्षण (प्राथ.) आस्था-१/वि.अ. शि नियुक्ती १०७१/७०१३ मु.का.अ.जि.प. चंद्रपूर (प्राथमिक शिक्षण विभाग) दि० ३० मार्च २०१३
महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शिक्षकाची , खोटी माहिती सादर करून, पदोन्नती पासून वंचित ठेवले, याशिवाय अनेक तक्रारी दाखल करून दखल घेतली नाही.
लक्षवेधी गंभीर तक्रारीची दखल घेऊन, तत्कालीन गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिंदेवाही चा प्रभार काढला परंतु विविध गैरवर्तणाच्या तक्रारी दाखल असल्याने भविष्यात जबाबदारीचे पद देवू नये. अशी संघटनात्मक मागणी करण्यात येत आहे.
दिव्यांग शाश्वत ओळखपत्र ( UDID ) सादर न केल्याने, वैयक्तिक व संघटनांच्या माध्यमातून लक्षवेधी तक्रारी दाखल करूनही, शिस्तभंग विषयक कारवाई साठी पात्र ठरत असूनही प्रशासनाने जाणीवपूर्वक संरक्षण देवून, पाठराखण करित असल्याचा आरोप सागर शंभरकर जिल्हाध्यक्ष स्वतंत्र समता शिक्षक संघटना जिल्हा चंद्रपूर तथा ज्येष्ठ उपाध्यक्ष मागासवर्गीय कर्मचारी संघटनांची कृती समिती जिल्हा चंद्रपूर यांनी केला आहे.