बुलडाणा : मुलानं आईच्या मदतीनं केला पित्याचा खून
बुलडाणा:- मुलाने आईच्या मदतीने आपल्या पित्याचा धारदार शस्त्राने निर्घृण खून केल्याची घटना घोशिंग ता. मोताळा येथे घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
घोशिंग येथील जगन शेजर वय 45 हा रविवारी रात्री घरी दारू पिऊन आला असता पत्नी मंदाबाई व मुलगा राजेंद्र जगन शेजर याचेशी त्याचे जोरदार भांडण झाले. यातच मुलाने आईच्या मदतीने वडिलांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून खून केला .
बोराखेडी पोलिसांनी रात्रीच संशयित आरोपी पत्नी व मुलाला ताब्यात घेऊन दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरिक्षक माधवराव गरूड घटनेचा तपास करीत आहेत.