डॉ.बी.आर. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा 

अक्षय पेटकर हिंगणघाट

हिंगणघाट:- डॉ.बी.आर. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. डॉ. बी.आर. आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार होते. ते प्रख्यात भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते ज्यांनी दलित बौद्ध चळवळी तसेच महिला व कामगारांच्या हक्कांना प्रेरित केले.

बौद्ध धर्मात, ‘परिनिर्वाण’ म्हणजे निर्वाण-नंतर-मृत्यू म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवर, ज्याने त्यांच्या आयुष्यात निर्वाण प्राप्त केले असेल. हे जगातून सोडलेले कार्य, कर्म आणि पुनर्जन्म तसेच स्कंधांचे विघटन सूचित करते.6 डिसेंबर 2020 महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून मानवंदना देण्यात आली . त्यानिमित्त उपस्थित राहूल वाघमारे, किशोर करनाके, संजय मंजेकर, रामेश्वर फरकाडे, यूगेश इंगोले, विशाल चहानकर, विक्की काऴे, स्वप्निल मुन, राजेश हस्ते, कमलाकर जारोडे, महेंद्र मडावी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन माय विलेज कल्ब पिंपरी या संघटनेने केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here